News

तिलक डेव्हिड आणि सॅम्स त्या अविस्मरणीय रात्रीबद्दल आपली मतं व्यक्त करताहेत

By Mumbai Indians

वानखेडे स्टेडियमवर सीएसकेविरूद्ध अविस्मरणीय विजय प्राप्त झाल्यानंतर संघात आनंदाचे वातावरण होते आणि आमच्या त्या दिवशीच्या तीन स्टार्सनी- तिलक वर्मा, डॅनियल सॅम्स आणि टिम डेव्हिड यांनी विजयाबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत.

तिलकने हृतिक शौकीनसोबत ४८ धावांची भागीदारी करून इनिंग स्थिर केली. त्याच्या प्रयत्नांमुळे टीमला यश प्राप्त झाले याचा त्याला खूप आनंद झाला.

 “माझ्या धावा कितीही झाल्या तरी टीमला विजय मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे. मला केकेआरच्या सामन्यातही संधी मिळाली. परंतु दुर्दैवाने मी आऊट झालो. सीएसकेविरूद्ध या संधीचा फायदा मला घ्यायचा होता,” तिलक म्हणाला.

या १९ वर्षीय खेळाडूचा खेळ पाहायला वानखेडेवर एक विशेष पाहुणे आले होते. त्यामुळे हा विजय आणखी गोड झाला.

“हा क्षण खूप खास होता कारण माझे कोच (सलाम बायश) मला लाइव्ह खेळताना पाहायला आले होते आणि त्यांच्यासमोर खेळताना मला खूप छान वाटले. ते टीमला विजयी करण्याबाबत खूप आग्रही असतात आणि त्यांनी आज माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले,” तिलक म्हणाला.

“मी माझ्या आपल्या पलटनचे आभार मानतो- त्यांनी महान खेळाडूंच्या नावाचा जयघोष केलाय आणि आता मी माझे नाव ऐकतो तेव्हा मला खूप आत्मविश्वास मिळतो. मी असेच करत राहीन अशी मला आशा आहे.”

आणखी एक खेळाडू ज्याला लाइव्ह खेळताना पाहण्यासाठी एक खास व्यक्ती आली होती. तो होता टिम डेव्हिड.

“माझे वडील नुकतेच क्वारंटाइनमधून बाहेर आले. त्यामुळे सीएसके विरूद्ध एमआयसारखा मोठा सामना पाहण्यासाठी ते वानखेडेवर आले तेव्हा मला खूप आनंद झाला,” डेव्हिडने सामन्यानंतर सांगितले.

डेव्हिडच्या वडिलांनी त्याला दोन षटकार ठोकून सामना संपवताना पाहिले आणि या फलंदाजाने तिलक आणि हृतिक या आमच्या तरूण तडफदार तोफांचे आम्हाला वर्चस्व मिळवून देण्यासाठी खूप कौतुक केले.

“हा सामना खूप रोमांचक होता आणि आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला हे अपेक्षित नव्हते. सीएसकेला पुन्हा उसळी मारू न देणे खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या इनिंग्स लवकर संपवण्यासाठी खूप चांगली कामगिरी केली. थोडावेळ फलंदाजी करणे कठीण वाटत होते आणि थोडे गडबडीचेही झाले होते. पण तिलक आणि हृतिक यांनी खूप चांगला खेळ केला. त्यामुळे सामना आमच्यासाठी चांगला झाला. आम्ही मेहनत करून वीरासारखे खेळलो,” तो म्हणाला.

अधिकृत सामनावीर डॅन सॅम्सने पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या आणि पॉवरप्लेमध्ये तीन एकूण विकेट्स घेतल्या. त्याला वानखेडेच्या वातावरणाचा खूप फायदा झाला.

“हा असा दिवस होता जेव्हा अगदी पहिल्या चेंडूपासून प्रत्येक गोष्ट आमच्या हितामध्ये होत गेली. आम्ही लवकर चेंडू हलत असताना काही विकेट्स घेतल्या आणि आम्हाला पुढेही हे करता आले. बॉल टी२० सामन्यात वर्चस्व गाजवतोय हे पाहणे खूप छान होते. हा एक सुंदर ऑलराऊंड परफॉर्मन्स होता,” सॅम्स म्हणाला.

सीएसकेसाठी एम. एस. धोनी हा शेवटचा दिग्गज फलंदाज असताना डॅनने सामन्याच्या १५ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. त्याने त्याच्यासाठी योजना बनवली होती.

“एकेक धाव न घेणाऱ्या एखाद्या फलंदाजाला गोलंदाजी करणे ही खूप रोमांचक गोष्ट असते. मी विचार केला की मी स्लो चेंडू टाकेन. त्यांच्यावर धावून जाणे त्याला कठीण जाईल. ही कल्पना खूप चांगली ठरली,” सॅम्स म्हणाला.

आमच्या घरच्या खेळपट्टीवर एक संपूर्ण परफॉर्मन्सनंतर आमच्या संघात उत्साहाचे वातावरण होते आणि आम्ही अशाच आणखी सामन्यांसाठी सज्ज आहोत!