News

मागच्या काही सामन्यांमध्ये आम्ही सातत्याने चांगली गोलंदाजी केलीयः शेन बॉन्ड

By Mumbai Indians

आमचे गोलंदाजीचे मार्गदर्शक शेन बॉन्ड यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली आणि आमच्या गोलंदाजांच्या कामगिरीबाबत तसेच डॅन सॅम्स आणि आमच्या तरूण गोलंदाजांमुळे ते किती प्रभावित आहेत याबद्दल चर्चा केली.

सीझन पुढे जात असताना गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत याबद्दल विचारले असता बॉन्ड यांनी सांगितले की, त्यांना स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागला आणणि मागच्या काही सामन्यांमध्ये निकाल अधिक स्पष्ट झाला आहे.

“एक गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही मागचे ४-५ सामने चांगली कामगिरी केली आहे. त्यांना आपल्या जबाबदाऱ्या समजत गेल्या आणि मागच्या काही सामन्यांमध्ये आम्ही जास्त आक्रमक होतो. आम्ही जास्त शॉर्ट बॉल्स टाकले आहेत. त्याचवेळी आम्ही कठीण परिस्थितीत शांत राहिलो आहोत,” बॉन्ड म्हणाले.

“आम्ही आता सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आम्ही आधीही चांगले खेळलो आहोत. परंतु थोड्या वाईट ओव्हर्समुळे आम्ही गेम्समधून बाद झालो. हे आत्ता झालेले नाही. त्यामुळे ही खूप सुधारणा आहे,” ते म्हणाले.

प्रशिक्षक कठीण सुरूवात झाल्यानंतर या सीझनला पालटवणाऱ्या डॅन सॅम्सबद्दलही खूप आनंदी होते.

“मी डॅनला अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे आमचे व्यावसायिक नाते खूप चांगले आहे. तो हे मान्य करेल की या सीझनच्या सुरूवातीला त्याची कामगिरी निराशाजनक होती. पण त्याने खूप मेहनत केली. आता आमच्यासाठी महत्त्वाच्या विकेट्स घेतो आहे. त्याने जीटीविरूद्ध टाकलेली ती ओव्हर अविश्वसनीय होती. खेळाडूच्या कामगिरीत सातत्यपूर्ण सुधारणा होताना पाहणे खूप आनंददायी आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि तो अधिकाधिक चांगली कामगिरी करतोय,” बॉन्ड म्हणाले.

त्याला वरच्या क्रमात पुढे आणण्याच्या निर्णयाबाबत बॉन्ड म्हणाले की ते काही अचानक ठरलेले नाही. हे आधीपासूनच नियोजित होते.

“आम्ही त्याला स्विंगपासून आमच्या फलंदाजांना वाचवण्यासाठी वरच्या फळीत पाठवलेले नाही. आम्हाला डॅनला फलंदाजीतही उत्तम कामगिरी करताना पाहायचे होते. तो ही भूमिका करू शकतो हे आम्हाला माहीत आहे,” ते म्हणाले.

बॉन्ड यांनी सध्या फॉर्ममध्ये असलेला बुमरा आणि हृतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय सिंग यांच्यासारख्या तरूण खेळाडूंचेही खूप कौतुक केले. त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून त्यांनी आपली क्षमता दाखवली आहे.

“मला बूमबद्दल बोलायला आवडते. तो एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याला कधीकधी मिळणे शक्य असलेल्या विकेट्स मिळत नाहीत. केकेआरविरूद्धची ५/१० ही कामगिरी इतरही सामन्यांमध्ये होऊ शकली असती. त्याला पुरस्कार मिळताना पाहणे आनंददायी आहे. हृतिककडे खूप आत्मविश्वास आहे. त्याच्याकडे चांगली कौशल्ये आहेत आणि तो चांगली गोलंदाजी करतोय. कार्तिकेयचेही तसेच आहे. या तरूण स्पिनर्सकडून चांगली गोलंदाजी पाहताना खूप छान वाटते,” बॉन्ड शेवटी म्हणाले.

आमच्या सर्वाधिक अविस्मरणीय गोलंदाजीच्या कामगिरींपैकी एक आणि तीही वानखेडेवर. हा आमच्यासाठी एक परफेक्ट सामना होता आणि आम्हाला असेच सामने खेळता येतील असा विश्वास आहे!