News

जिंकलो तरी सोबत, हरलो तरी सोबतः झॅक आणि रोहितकडून संघाला प्रोत्साहन

By Mumbai Indians

केकेआरविरूद्धच्या सामन्यात हार पत्करावी लागल्यानंतर एमआयचा संघ अतिशय निराश झाला होता कारण त्यांना टाटा आयपीएल २०२२ मध्ये सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला.

परंतु ड्रेसिंग रूममध्ये टीमचे नेते कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक झहीर खान यांनी टीमचे मनोबल वाढवले.

रोहितने टीममध्ये एकता आवश्यक असल्याबद्दल चर्चा केली आणि जिंकण्यासाठी आणखी प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले.

“आपण एकमेकांना दोष देऊन चालणार नाही. आपण सर्व एकत्र आहोत. हरलो तरी एकत्र, जिंकलो तरी एकत्र. माझ्यासाठी ही सर्वांत सोपी गोष्ट आहे. आपण या तिन्ही सामन्यांमध्या चांगली कामगिरी केली आहे. फक्त आता आपल्या सर्व अकरा जणांना एकत्र येऊन सामने जिंकायचे आहेत,” रोहित म्हणाला.

“मला वाटते की आपल्याकडून थोड्या इच्छाशक्तीची गरज आहे. कारण ती खूप महत्त्वाची आहे. विरोधक वेगवेगळे आहे. ते वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. आपल्याला फक्त त्यांच्या पुढे राहायचे आहे. आपल्या बॅट आणि बॉलसोबत जिंकण्याची आस असणे अत्यंत आवश्यक आहे.”

कर्णधाराने सामन्यातील महत्त्वाचे क्षण ओळखणे आणि विजय प्राप्त करण्यासाठी त्यांचा फायदा घेणे गरजेचे असल्याबद्दलही सांगितले.

“या तिन्ही सामन्यांत आपण काही खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. आपल्याला एक व्यक्ती म्हणून महत्त्वाच्या क्षणांमधील संदेश समजणे गरजेचे आहे. आपल्याला हे क्षण आपल्या हितामध्ये फिरवायचे आहेत,” तो म्हणाला.

“आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपण टॅलेंट आणि क्षमतेची चर्चा करतो. परंतु आपण ती आस आणि भूक जागवली नाही तर आपल्याला विरोधक विजय हातात आणून देणार नाहीत. ते आपल्याकडून विजय घेऊन गेले आणि आपल्याला त्यांच्याकडून तो काढून घ्यायचा आहे.”

झॅकनेही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले.

“आपल्याला खूप मेहनत करायची गरज आहे आणि एक दोन जणांमधला स्पार्क दिसण्याची गरज आहे. हे आपल्यासाठी दुसरे कुणी करणार नाहीये. ज्याच्याकडे आहे त्याला तो टीमसोबत न्यायचा आहे,” तो म्हणाला.

झॅकने संपूर्ण सीझनमध्ये टीमला आपला दृष्टीकोन बदलून आपल्या बाजूने गोष्टी वळवण्याची गरजही व्यक्त केली.

“आता आपण सीझनकडे कशा प्रकारे बघतो ते महत्त्वाचे ठरणार आहे. आपण यापूर्वीही ते केलेले आहे. त्यामुळे आपण करू शकणार नाही असे नाही. आपला दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, प्रेरणा शोधायला हवी, लढा शोधायला हवा आणि विश्वास कायम ठेवायला हवा,” झॅक म्हणाला.

या दोन सर्वाधिक अनुभवी खेळाडूंकडून प्रेरणादायी शब्दांमुळे टीममध्ये पुन्हा एकदा उत्साह भरला आहे. टीम आता कशा प्रकारे प्रतिसाद देते हे पाहणे स्वारस्यपूर्ण ठरेल.

तुमचा सपोर्ट कायम ठेवा, पलटन!