News

अमेरिकेत मिनीला ताकद देण्यासाठी ४७*(२२): सुपर किंग्सविरूद्ध पॉलीची जादू … सगळं आहे तसंच आहे यार!

By Mumbai Indians

आमच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर ते कायम तयारीतच असतात. तुम्हाला मैदानावर आणि मैदानाबाहेरही २४x७ अ‍ॅक्शनची हमी नेहमीच मिळते! 🙌

या आठवड्याची महत्त्वाची बातमी अमेरिकेतील आमच्या खेळाडूंबद्दल आहे. त्यांनी कठीण परिस्थितीत एमएलसी २०२५ च्या अंतिम फेरीत धमाकेदार कामगिरी केली. आता मिनीचा सामना वॉशिंग्टन फ्रीडमशी होईल. यंदा स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा विक्रमी ट्रॉफी उचलण्याचे ध्येय आहे!

चला तर बघूया काय काय घडले ते... अर्थात मागच्या आठवड्यात बरेच काही घडले आहे.

१२ जुलै| पॉलीचे परफेक्शन? यलोमधल्या टीमविरूद्ध? येस्स.

पोलार्डच्या आयुष्यातला हा एक नेहमीचा दिवस … 😉 आपल्या संपूर्ण करियरमध्ये त्याला यलो गणवेशाविरूद्ध खेळताना मजा आली आहे. नाही का?

…आणि टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध एमएलसी २०२५ उपांत्य सामनाही वेगळा नव्हता! त्याने १७२ धावांचा पाठलाग करताना २२ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ४७ धावा फटकावल्या आणि आपल्या संघाला एमएलसी २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली. काहीही बदललेलं नाहीये यार, आजही सगळं जसंच्या तसंच आहे... 🫰

**********

११ जुलै | बुमराहच्या ४५० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण

इंग्लंड आणि भारतामधील चालू तिसऱ्या कसोटी सामन्यात जस्सीने दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची विकेट घेऊन आणखी एक टप्पा पार केला. आता तर सवयच लागलीय आम्हाला... 😌 

**********

१० जुलै | क्लच गॉडच्या बॅटसोबत बोल्टीचा क्लच खेळ

एमएलसी २०२५ मध्ये एमआय न्यूयॉर्कने रोमांचक एलिमिनेटर सामन्यात सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉर्नचा दोन विकेट्सनी पराभव केला. ⚡

सामनावीर ठरलेल्या ट्रेंट बोल्टने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार मारून धावांचा ताण कमी केला आणि मिनीचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोहोचला. त्या जबरदस्त फटक्यांमागील कहाणी? नक्की पहा...

**********

९ जुलै | जॅक्स विलची अष्टपैलू कामगिरी

२०२५ च्या व्हाइटॅलिटी ब्लास्टमध्ये ग्लॉस्टरशायरविरुद्ध झालेल्या सामन्यात, सरे संघाच्या विल जॅक्सने 👌 कामगिरी केली. त्याने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या आणि तीन षटकांत १७ धावा देऊन २/१७ विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या संघाला २८ धावांनी विजय मिळवून दिला. तोडलंस भावा!

**********

-९ जुलै | दीपक, बूम आणि स्काय यांची विम्बल्डन फीलिंग

आपल्या पोरांनी लंडनमध्ये होत असलेल्या विम्बल्डन चॅम्पियनशिपचा अनुभव घेतला. 🎾

हे तिघेही आपापल्या जोडीदारांसह सेंटर कोर्टवर विम्बल्डन पाहण्यासाठी गेले होते.

**********

८ जुलै| बॉशची आणखी एक देखणी कामगिरी

कॉर्बिन सध्या घोड्यावर स्वार झालाय!!! 🥳

पहिल्या #ZIMvSA कसोटीत एक शतक फटकावून वर ५ धावा काढल्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या डावात ३८ धावांत ४ बळी घेत आणखी एक 🤩 कामगिरी केली आणि आपल्या संघाला एक डाव आणि २३६ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.

**********

८ जुलै | विघ्नेश पुथूर प्रशिक्षणासाठी परतला

आयपीएल २०२५ मध्ये मधूनच दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर पडलेला आपला #OneFamily चा हा तरूण खेळाडू आपल्या प्रशिक्षणासाठी परतला आहे.

तुझ्या फिरकीची जादू बघायला आतूर आहोत विघ्नेश!

**********

७ जुलै | स्काय आणि देविशाची वेडिंग एनिव्हर्सरी

आपल्या लाडक्या जोडीच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस अत्यंत सुंदर होता. त्या दोघांनी एकत्र हा दिवस साजरा केला.

आमच्या लव्हबर्ड्सना कोणाची नजर ना लागो🧿🧿!