टिम
टिम
डेव्हिड
डेव्हिड
जन्मतारीख
मार्च 16, 1996
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
ऑफ ब्रेक
प्रोफाइल
माहिती
टिम बाबत

टिम डेव्हिड मूडमध्ये असतो तेव्हा कितीही मोठी धावसंख्या कमीच असते, कोणतीही सीमारेषा फार लांब नसते आणि कोणत्याही गोलंदाजाला सुट्टी मिळत नाही. बॅट हातात असल्यावर तो अक्षरशः तुटून पडतोः आपल्या एमआय पलटनला विचारा!

मूळचा सिंगापूरचा आणि ऑस्ट्रेलियात मोठा झालेला टिम माजी सिंगापूर सीमर रॉड डेव्हिड यांचा मुलगा आहे. बिग बॅश लीगच्या २०१७-१८ सीझनमध्ये त्याच्या फलंदाजीच्या तंत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लवकरच सिंगापूर राष्ट्रीय संघात त्याचा समावेश झाला. वर्ल्ड कप चॅलेंज लिस्ट ए मध्ये पाच सामन्यांत ३६९ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

त्यानंतरच्या एक दोन वर्षांत तो संपूर्ण जगभर प्रवास करत होता. तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू ठरला. २०२२ च्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी डेथ ओव्हर्समध्ये त्याने खूप चांगल्या धावा केल्या आणि फक्त ८ सामन्यांमध्ये १८५ धावा फटकावल्या. तो आता ऑस्ट्रेलियन निवड समितीच्या नजरेत भरला आहे आणि आता लहान वयोगटातल्या क्रिकेटपटूपासून मोठ्या वयोगटातही स्थिरावला आहे.

त्याची उंची ६ फूट ५ इंच आहे. त्याचे हात लांबसडक आहेत आणि त्यामुळे त्याला चेंडू अक्षरशः अवकाशात पाठवणे सोपे जाते. त्याचे मैदानावरचे अस्तित्व आपल्या मधल्या फळीसाठी महत्त्वाचे ठरेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता