अर्जुन
अर्जुन
तेंडुलकर
तेंडुलकर
जन्मतारीख
सप्टेंबर 24, 1999
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
अर्जुन बाबत

स्टँडमध्ये एमआयचा ध्वज हातात घेऊन मिरवणारा चिमुकला मुलगा ते आता एमआयची जर्सी अभिमानाने घालून वावरणारा तरूण हा अर्जुन तेंडुलकरचा ब्लू आणि गोल्डसोबतचा प्रवास मोठा आहे.

जगातल्या सर्वांत महान क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकर यांचा मुलगा असलेला अर्जुन आपल्या वडिलांप्रमाणेच अष्टपैलू म्हणून पुढे आलाय. उंच, सडसडीत, बॉल आणि बॅट उत्तमरित्या स्विंग करू शकणाऱ्या अर्जुनने मुंबईमध्ये आपले देशांतर्गत क्रिकेट करियर सुरू केले. परंतु २०२२ मध्ये तो गोव्यासाठी खेळू लागला आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळणारा सर्वांत तरूण खेळाडू ठरला.

त्याने रणजीमध्ये प्रथमच खेळताना राजस्थानविरूद्ध १२० धावा आणि ३/१०४ अशी कामगिरी करून सर्वांचे डोळे दिपवले. तो एमआयमध्ये २०२१ च्या लिलावात आला आणि २०२२ मध्येही त्याला निवडण्यात आले. तो २०२३ मध्ये पहिला सामना खेळला आणि आता आयपीएल २०२४ मध्ये आणखी पुढे जाण्यासाठी उत्सुक आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता