{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
रूरकीमध्ये जन्म झालेला जलदगती गोलंदाज. त्याने २०१९ मध्ये टी२०मध्ये कर्नाटकविरूद्ध पहिला सामना खेळला. सुरूवातीला तो आयपीएल २०२२ मध्ये दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या बदली खेळाडू म्हणून आला होता.
देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्तराखंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना त्याने तरूण गोलंदाजांच्या फळीचे नेतृत्व करून सर्वांवर प्रभाव टाकला. त्याने टी२० सामन्यात कठीण ओव्हर्समध्येही गोलंदाजी केली. डीवाय पाटील ट्रॉफी २०२३ च्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने रिलायन्स १ ला विजय मिळवून देण्यासाठी केलेली गोलंदाजी सर्वांच्या लक्षात राहिली आहे. शेवटच्या चार चेंडूंमध्ये दोन धावांचा त्याने केलेला बचाव ही त्याच्या कर्तृत्वाची परिसीमाच म्हणावी लागेल. त्याचा वेग उत्तम आहे आणि चेंडू फिरवण्याचीही कला त्याला अवगत आहे. त्यामुळे या वेळी आमच्यासाठी एक मोठी जबाबदारी पार पडेल असे आम्हाला वाटते.