“एमआयकडे अनेक सामना विजेते असल्यामुळे ती खतरनाक टीम आहे हे सर्वांना माहीत आहे”: दीपक चहर
पलटन, तयारी करा कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सदरम्यान १० मे २०२६ रोजी आणखी एक ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. आता आपण आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि ही स्पर्धा आता जोरदार होणार आहे. त्यात प्रचंड तणाव असणार आहे. कारण हा असा सामना आहे जिथे चाहत्यांना आपल्या हिरोजना प्रतिस्पर्धी संघावर हल्ला करताना पाहण्याची संधी मिळेल. मेन इन ब्लू अँड गोल्ड हाय व्होल्टेज सामन्यासाठी तयार होत असातना पलटन प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत असेल. या सामन्यापूर्वी एमआयचा स्टार जलदगती खेळाडू दीपक चहरने एमआय चर्चामध्ये सहभाग घेतला. त्याने लय, स्विंग आणि टी२० स्पर्धेत लवकर विकेट घेण्याची कला याबाबत चर्चा केली. त्याने चेहऱ्यावर आपली खास स्माइल ठेवून संवाद साधला. 💙
दीपक चहरला फर्स्ट क्लास सामन्यात खेळायला सुरूवात करून १६ वर्षे झाली आहेत. त्याने मागील काही वर्षांत सामन्यात आणि सराव पद्धतीतील झालेले बदल याबाबत चर्चा केली. तो म्हणाला की, “मी खेळायला सुरूवात केली तेव्हा टी२० ही फार काही मोठी गोष्ट नव्हती. तेव्हा रणजी ट्रॉफी आणि भारताचे प्रतिनिधित्व करणे महत्त्वाचे मानले जात होते. आता परिस्थिती बदलली आहे आणि पोरं वर्षाच्या सुरूवातीपासूनच टी२० स्वरूपात खेळण्यासाठी तयारी करतात. क्रिकेटपटू चांगल्या लांबीच्या चेंडूवर मोठमोठे फटके मारण्यासाठी सराव करतात. साइड आर्म स्पेशालिस्ट आणि गोलंदाजीच्या मशीन्स वापरात आल्या आहेत. त्यामुळे वेगाने गोलंदाजी करण्यात फारशी अडचण येत नाही. आता सर्वांच्याच खेळण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. आम्ही कमी लांबीचे फार चेंडू टाकत नाही. सपाट पिचमुळे स्विंग कमी होतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळे प्रकार वापरून बघतो. नियंत्रण आणि कौशल्य यांना खूप महत्त्व असते.”
Listen in to the story of the night Deepak Chahar broke the record books and much more on #MICharcha, on the @Dream11 app! 💙 pic.twitter.com/3Mvw7kIV5E
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2026
रोजी जुन्या आठवणींना उजाळा देताना- २०१९ मध्ये चहरने बांगलादेशविरुद्धच्या आपल्या गोलंदाजीत ६/७ अशी कामगिरी केली होती आणि बांगलादेशचा संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता, तेव्हा आपल्याच डीसीने त्यांच्या तळाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेत हॅट-ट्रिक साधली होती 🔥. त्याने सांगितले, “या विक्रमाचे श्रेय कर्णधार रोहित शर्माला जाते. तो म्हणाला की त्या दिवशी तो माझा वापर (जसप्रीत) बुमराहसारखा करेल. नंतर भागीदारी आधीच पूर्ण झाली तेव्हा त्याने मला ११ वी ओव्हर दिली. तिथेही मी एक विकेट घेतली. शेवटी दोन ओव्हर्स टाकल्यामुळे मला हॅट-ट्रिक मिळाली. रोहितच्या नियोजनामुळेच मी तो पराक्रम करू शकलो.”
मग गंमतीने दीपकने आपल्याला खालील एमआय गोलंदाजांना कोणती कौशल्ये आणि चेंडू शिकवायला आवडतील. “जसप्रीत बुमराह- नकल बाउन्सर आणि लेग कटर. ट्रेंट बोल्ट- इनस्विंग. हार्दिक पांड्या- यॉर्कर. शार्दुल ठाकूर- इनस्विंग. लसिथ मलिंगा- इनस्विंग, लेग कटर आणि नकल बॉल.”😆
मैदानावर परिस्थिती कोणतीही असो, तो सकारात्मकतेने वावरतो आणि संयमाने गोष्टी हाताळतो. यावरही त्याने भाष्य केले. तो म्हणाला, “हे सर्व आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. मैदानावर कोणालाही लवकर राग येता कामा नये. सामना तुमच्या मनासारखा झाला नाही, तर शांतपणे बसून गोष्टी का चुकल्या यावर विचार करायला हवा. एखाद्या ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या, तर माझ्या योजनेनुसार काय घडले नाही याचा विचार मी करतो. एक गोलंदाज म्हणू काही दिवस चांगले असतात तर काही वाईट. काही वेळा खराब चेंडूंवर विकेट मिळतात तर कधी चांगल्या चेंडूंवर धावा जाऊ शकतात. प्रत्येक खेळाडूला अशा प्रकारच्या दबावाच्या परिस्थितीला कसे हाताळायचे हे माहीत असणे आवश्यक आहे. मग तो कोणत्याही स्तरावर खेळत असो.”
अंतिमतः दीपकने लीग टप्प्यात मुंबई इंडियन्ससाठी उर्वरित चारही सामने जिंकण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “मी पुढील चार सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. हो, आमच्याकडून आधी चुका झाल्या, पण आम्ही असा संघ आहोत जो पुनरागमन करून सलग सामने जिंकू शकतो. गेल्या वर्षीही आम्ही सलग सहा सामने जिंकले होते. आता आम्हाला मैदानावर आमचे एकशे दहा टक्के प्रयत्न करून पुढील चार सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. सर्वांना माहीत आहे की, आमच्या संघात अनेक सामना जिंकून देणारे खेळाडू असून आम्ही एक खतरनाक टीम आहोत.”💪