आमचा मास्टर फॉरेव्हर- हॅप्पी बर्थ डे सचिन तेंडुलकर

आमचा मास्टर फॉरेव्हर- हॅप्पी बर्थ डे सचिन तेंडुलकर

By Mumbai Indians

प्रिय सचिन तुला हॅप्पी बर्थडे, 🎂

तुझ्या मैदानातल्या जादूचे आम्ही साक्षीदार आणि प्रेमी आहोत 🔥

तू आम्हाला अशा अगणित आठवणी दिल्या ज्या हृदयावर कोरलेल्या आहेत, 🎁

तू लाखो चाहत्यांच्या नजरेतला ध्रुव तारा आहेस... 😊

द्विशतकांपासून ते चमकदार खेळापर्यंत. 😍

तू आमच्या मनात विश्वास जागृत केलास आणि आमचे जग अमर्याद स्वप्नांनी भरून टाकलेस. 💙

तू आमचे काळीज आणि आमचा जीव आहेस. 👊

आमच्या प्रत्येक सीझनमधला मास्टर आणि आमचा अभिमान आहेस. 🫡

प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या काळजाच्या तुकड्याला आमचे प्रेम 🫶

एका शालेय स्पर्धेत ६६४ धावा करणारा एक लहान मुलगा देशाचे धडकते काळीज बनेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. सचिन तेंडुलकर हे नाव घेतले की सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. भारताच्या जर्सीवर कोरलेले त्याचे नाव आजही प्रत्येक खेळाडूची भावना आहे. तो मैदानात खेळायला उतरायचा तेव्हा आपल्याला आज काय जादू पाहायला मिळेल याची आम्हाला कायम उत्सुकता असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, पुल शॉट्स, चौकार आणि षट्कार म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानीच. त्याची एक झलक पाहायला, त्याच्यासोबत फोटो काढायला, त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आजही झुंबड उडते आणि तो प्रत्येक मुलाचे स्वप्न आहे.

कोणत्याही टीममध्ये तो एका दीपस्तंभासारखा असतो. अत्यंत शांत आणि तरीही खेळाडूंच्या शेजारी एका भक्कम पहाडासारखा उभा राहून तो त्यांना सल्ला देतो. टीमची संस्कृती निर्माण करणारा तो एक फोर्स आहे आणि तो प्रत्येकालाच सर्वोत्तमम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. सचिन म्हणजे काळीज, जिगर आणि जीव.

महान खेळाडू निवृत्त होतात. पण त्याच्यासारखे खेळाडू कायम मनात राहतात. सचिन... सचिन... हा जल्लोष वानखेडे स्टेडियमवर नॉस्टॅल्जिक बनवणारा आहे. सचिन मैदानात उतरतो तेव्हा आजही काळजाचा ठोका चुकतो. आपल्या सर्वांच्या मनात त्याच्यासोबतचा एक खास क्षण आहे. त्याचे द्विशतक, शारजामध्ये आलेले वादळ आणि इतर अनेक गोष्टी आपण विसरू शकत नाही. त्याचे फटके अभ्यासाचे विषय बनले आहेत. एखाद्या खेळाडूची महानता फक्त कौशल्यावर नसते तर त्याचा स्वभाव, टायमिंग आणि विश्वास यातही असते. आजही एखादा नवीन खेळाडू बॅट हातात पकडतो तेव्हा त्याच्या मनात सचिनसारखेच खेळण्याचे स्वप्न असते.