News

UPWvMI पूर्वावलोकन: थोडा बदला, उत्साह आणि प्लेऑफमध्ये जागा मिळण्यासाठी शर्थ

By Mumbai Indians

तीन सामने, तीन जागा. आटोकाट प्रयत्न होणार आहेत. एकाही टीमने अजून हार मानलेली नाही. डब्ल्यूपीएल आता संपत आले असताना एमआयसाठी युद्धाची घोषणा झाली आहे.

यूपी वॉरियर्झ आता पुढचा संघ आहे. या टीमने आतापर्यंत आपला दिल्लीतला सामना खेळलेला आहे आणि लीगच्या पहिल्या टप्प्यात आपण याच टीमविरूद्ध हरलो आहोत. हाच सामना किरण नवगिरेने जोरदार हल्ला करून ५० धावा पटकावत आपल्या ताब्यातून हिसकावला होता. आपल्याला पेटून उठण्याची गरज आहे, आपल्याला जोश आणायचा आहे. इथे जिंकण्यासाठी खूप काही आहे.

आपला दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना फार काही चांगला नव्हता. पण त्याही सामन्यात बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या. या वर्षाच्या आयपीएलमध्ये प्रथमच आपल्या मधल्या फळीची कसोटी लागली आणि अमनज्योत कौरने फटक्यांची मेजवानी दिली. पूजा वस्त्रकार आणि साईका ईशाक यांनी मधल्या टप्प्यात गोलंदाजी करताना धावांवर नियंत्रण ठेवले. हा सामना आपला आत्मविश्वास वाढवणारा ठरला. आता आपले गुण वाढवायला हवेत आणि त्यासोबत गुणतक्त्यातील आपले स्थानदेखील मजबूत करायला हवे.

काय: यूपी वॉरियर्झ विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: ७ मार्च २०२४ | रात्री ७.३० वाजता.

कुठे: अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली.

काय अपेक्षा आहे: आणखी एक धावांची मेजवानी. इथले आधीचे दोन सामने कसोटीचे होते. फार दंव पडेल अशी अपेक्षा नाहीये. इथे आधी फलंदाजी करायला मिळाली तर मजा येईल. मग तर दणदणादण दणदणादण!