News

पराभवाचे चक्र भेदण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध उतरणार रोहितची पलटन

By Mumbai Indians

टाटा आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना २४ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सशी होईल. हा इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा ३७ वा सामना असेल. टूर्नामेंटमध्ये मुंबई इंडियन्सला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्याचवेळी के एल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स आठ गुणांसह टॉप ४ मध्ये आहे.

एमआयची टीम अंकतालिकेत शेवटच्या पायरीवर आहे. तर एलएसजी चौथ्या क्रमांकवर आहे. मुंबई एकही सामना न जिंकल्यामुळे प्लेऑफमधून जवळपास बाहेरच पडलेली आहे. परंतु टीमला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. एलएसजीने आतापर्यंत सात सामने खेळलेत आणि त्यातल्या चार सामन्यांत त्यांना विजय आणि तीनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. टाटा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये एकदा सामना झाला आहे. त्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला विजय प्राप्त झाला आहे. या सामन्यात एमआयने १८१ आणि एलएसजीने १९९ धावा काढल्या होत्या.

एमआयच्या या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

मुंबई इंडियन्सच्या फॉर्ममधील फलंदाज तिलक वर्माने आतापर्यंत या सीझनमध्ये १७ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने २३४ धावा काढल्या आहेत. एलएसजीसोबतच्या मागील सामन्यात त्याने २६ धावा काढल्या होत्या. सूर्यकुमार यादवनेही या सीझनमध्ये १५३.६४ च्या स्ट्राइक रेटने २३२ धावा काढल्या आहेत. त्यात १७ चौकार आणि १३ षटकार आहेत. ईशान किशनने एलएसजीसोबतच्या मागील सामन्यात १३ धावा काढल्या होत्या.

ईशानने मागील काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केलेली नाही. परंतु त्याला अजूनही चांगला स्कोअर करता येईल अशी टीमला आशा आहे. ईशानने आतापर्यंत ११६.४६ च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा काढल्या आहेत. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर एमआयचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा टीमचा एक अत्यंत विश्वासू गोलंदाज आहे. बुमरा चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज मुरूगन अश्विन, जयदेव उनादकट आणि टायमल मिल्स यांनी या सीझनमध्ये प्रत्येकी सहा विकेट्स काढल्या आहेत.

एलएसजीच्या या खेळाडूंपासून सावध राहावे लागेल.

लखनौचा कर्णधार राहुल उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने या सीझनमध्ये २६५ धावा काढल्या आहेत. तो सर्वाधिक धावांबाबत राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर (४९१) च्या मागील स्थानावर आहेत.

एलएसजीचा गोलंदाज अवेश खान ११ विकेट्स घेऊन उत्तम गोलंदाजी करतोय. एमआयच्या टीमला या खेळाडूंपासून सावध राहून वानखेडेवर आपला पहिला विजय प्राप्त करायची प्रतीक्षा असेल.