News

मिशन २-२! शेवटचा टप्पा- ओव्हलवर बाजी मारण्यासाठी भारत सज्ज

By Mumbai Indians

क्रिकेट चाहते लाँग लिव्ह टेस्ट क्रिकेटचा जयघोष करत असतात. त्याला एक महत्त्वाचे कारण आहे आणि भारताचा इंग्लंड दौरा २०२५ हे त्याचे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. 😎

जबरदस्त एक्शन, नॉन स्टॉप ड्रामा आणि नाट्यमय अनुभव आपण पाचव्या कसोटीसाठी ओव्हलवर जात असताना अनुभवतो!

आपले चारही सामने अटीतटीने खेळले गेले, दोन्ही संघांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आणि जीव ओतला. सध्या तरी मालिका इंग्लंडच्या बाजूने २-१ ने आहे. परंतु टीम इंडिया उद्या लंडनला मैदानात उतरत असताना समसमान संख्या गाठण्याची संधी आहे.

आतापर्यंत काय काय घडले त्याची थोडक्यात उजळणी करूया … ⏪

पहिली कसोटी | शुभमनच्या कर्णधार पदाच्या पहिल्याच संधीत शतक

गिल, वायबीजे आणि केएल या तिघांनीही शतके झळकावली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. बुमराहने जबरदस्त अर्धशतक ठोकले, पण इंग्लंडने विजय मिळवला.

दुसरी कसोटी | एजबास्टनवर ऐतिहासिक कामगिरी

कर्णधार शुभमन गिलने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली 🔛 त्याने २६९ आणि १६१ धावा केल्या, तर आकाश दीप (१० विकेट्स) आणि सिराज (सहा विकेट्स) यांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताने जोरदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आणि या वेळी नऊ प्रयत्नांत पहिल्या कसोटीत विजय नोंदवला. १-१, गेम ऑन!

तिसरी कसोटी | ख्यातनाम लॉर्ड्सवर एक कालातीत कामगिरी

बूम आणि केएल राहुल यांनी Lord’s Honours Board वर एक नेत्रदीपक पाच विकेट्सची कामगिरी आणि अप्रतिम शतकासह आपले नाव कोरले. अत्यंत अटीतटीच्या पाठलागानंतरही भारताला फक्त २२ धावा कमी पडल्या. सिराजच्या जवळपास परफेक्ट बचावानंतरही चेंडू स्टंप्सकडे परत आला नसता तर...

चौथी कसोटी | पाच सत्रांची गोष्ट मालिका जिवंत ठेवते  

मालिका ताब्यातून निसटत असतानाही आपल्या खेळाडूंनी मजबूत पकड राखली! चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ३११ धावांनी पिछाडीवर असताना आपण पहिल्याच ओव्हरमध्ये ०/२ अशा स्थितीत अडचणीत आलो होतो.

त्यानंतरच्या सत्रांमध्ये तूफान लढाई झाली – आपण प्राणपणाने खेळलो. 🫡 शुभमन, वाशी आणि जड्डू यांनी शतके झळकावून सामना बरोबरीत सोडवला.

**********

या संपूर्ण मालिकेत एक नाव आपल्या हृदयात कोरले गेले. ते म्हणजे जसप्रीत बुमराह. 🙌

जस्सी हा आपला आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने तीन सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या. त्यात दोन वेळा पाच विकेट्सचा समावेश आहे. त्याच्या वेगवान गतीचा फटका यष्टीरक्षकांना सहन करावा लागला आणि आगामी कसोटीही यापेक्षा वेगळी नसण्याची आशा आहे.

...आणि हो- कर्णधार म्हणून शुभमनची ही पहिलीच मालिका आहे. त्याने फलंदाजी आणि त्याने आत्मविश्वासाने नेतृत्व केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्याचा खेळ बघून तुम्हाला काहीतरी आठवते का?? आठवते का बीजीटी २०२०-२१!!!🤩

मालिकेतील शेवटच्या सामन्यातील तो प्रसिद्ध विजय. तिथे आपण द गॅब्बामध्ये ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा कसोटी अजिंक्य प्रवास संपवला. भारतीय संघाला सर्व अडचणींविरुद्ध आव्हाने स्वीकारणे आणि निर्भयपणे लढणे आवडते याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. टूटा है गब्बा का घमंड...🔥

अर्थात, ओव्हलमधील आपला रेकॉर्ड सर्वोत्तम नाही. पण भारतीय क्रिकेट टीमने वारंवार जोरदार प्रत्युत्तरे दिली आहेत तेव्हा मागे काय घडले ते सोडून द्यावे. तुमच्या माहितीसाठी खेळाच्या सर्वात लांब स्वरूपात ओव्हलमध्ये आपली कामगिरी येथे आहे:

खेळलेले कसोटी सामने

जिंकले

बरोबरीत

हरले

१५

इंडिया, चला खेळूया! ओव्हलवर भेटू... फायनल पंच द्यायला तयार व्हा 💥