News

इंग्लंडमधील २०२६ मधील भारताच्या भव्य व्हाइट बॉल सीझनची घोषणा

By Mumbai Indians

तर मंडळी, जरा इकडे लक्ष द्या. २०२६ च्या मध्यावर आपण क्रिकेटिंगचे काही प्लॅन्स ठरवले आहेत आणि आपण त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. 🔥

पुढच्या वर्षी पावसाळ्यात काय करायचं असा प्रश्न असेल तर तो आता सुटला आहे. टीम इंडियाचा पुरूष आणि स्त्रियांचा इंग्लंड २०२६ चा दौरा ठरलाय🏏✈️

आणि कल्पना करा? आमचा उत्साह आत्ताच शिगोशीग भरून वाहतोय.💥

२०२२ मध्ये पुरूषांच्या संघाने व्हाइट बॉल मालिका पूर्णपणे खिशात टाकली होती. २०२५ मध्ये महिला संघानेही हाच कित्ता गिरवला. त्यामुळे २०२६ हे वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो ते सिक्वेलचे आहे. 🎬🔥

📅 तुमची कॅलेंडर्स बाहेर काढा मंडळी. सामने असे होणार आहेत

भारताचा पुरूषांचा इंग्लंड दौरा २०२६

सामना

तारीख

वेळ (भारतीय प्रमाणवेळ)

स्थळ

पहिला टी२०आय

१ जुलै

रात्री ११.०० वाजता

चेस्टर ले स्ट्रीट

दुसरा टी२०आय

४ जुलै

सायंकाळी ७.०० वाजता

मँचेस्टर

तिसरा टी२०आय

७ जुलै

रात्री ११.०० वाजता

नॉटिंगहम

चौथा टी२०आय

९ जुलै

रात्री ११.०० वाजता

ब्रिस्टॉल

पाचवा टी२०आय

११ जुलै

रात्री ११.०० वाजता

साऊथअम्टन

पहिला ओडीआय

१४ जुलै

सायंकाळी ५.३० वाजता

बर्मिंगहम

दुसरा ओडीआय

१६ जुलै

सायंकाळी ५.३० वाजता

कार्डिफ

तिसरा ओडीआय

१९ जुलै

दुपारी ३.३० वाजता

लॉर्ड्स

भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा २०२६

सामना

तारीख

वेळ (भारतीय प्रमाणवेळ)

स्थळ

पहिला टी२०आय

२८ मे

रात्री ११.०० वाजता

चेम्प्सफोर्ड

दुसरा टी२०आय

३० मे

रात्री ११.०० वाजता

ब्रिस्टॉल

तिसरा टी२०आय

२ जून

रात्री ११.०० वाजता

टॉन्टन

फक्त कसोटी

१० जुलै- १३ जुलै

दुपारी ३.३० वाजता

लॉर्ड्स

ही मालिका चुकवू नका. तारखा मांडून ठेवा. कॅलेंडर जवळ ठेवा. मज्जा करा.