News

ENGvIND, चौथा कसोटी सामना: शूरवीर योद्धा भारताची लढाई, मँचेस्टरचा सामना अनिर्णित!

By Mumbai Indians

आणखी एक कसोटी सामना, आपल्याला श्वास रोखायला लावणारे आणखी पाच दिवस! 💯

भारताचा इंग्लंड दौरा २०२५ चा चौथा सामना बरोबरीत सुटला. यजमान संघाने सामन्याच्या बऱ्याचशा भागात मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही.

ऋषभ पंतची जबराट खेली, जो रूटचे विक्रमी शतक, शुभमन गिलचे मालिकेतील चौथे शतक, जडेजा- सुंदर- स्टोक यांचे अष्टपैलू योगदान. बऱ्याच गोष्टी या सामन्यात घडल्या. 🗣️

ओल्ड ट्रॅफोल्डवर पाच दिवस कसे गेले? चला पाहूया...

पहिला दिवस | आपल्या खेळाडूंनी मैदान गाजवले

पुन्हा एकदा फलंदाजीला उतरलेल्या केएल- वायबीजे या जोडीने अत्यंत उत्तम फलंदाजी करत ९४ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने अर्धशतक फटकावले.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनने कसोटीतले आपले पहिले अर्धशतक फटकावले. त्याने सात चौकारांसह ६१ धावा केल्या. 👏

परंतु, ६८ व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतच्या घोट्याला ख्रिस वोक्सचा चेंडू लागला. ऋषभने ३७ धावा केल्या होत्या. मात्र त्याला दुखापतीमुळे सामन्याबाहेर जावे लागेल. 😕

📝 स्टंप्स, दिवस १: भारत - २६४/(८३ ओव्हर्स)

दिवस दुसरा | योद्धा पंतची अद्वितीय कामगिरी

टीम इंडियाने आपल्या आदल्या दिवसाच्या धावसंख्येत आणखी ९४ धावांची भर घालून ३५८/१० वर खेळ थांबवला.

पंतने आपल्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार होत असताना टीमला सर्वाधिक गरज असताना मैदानात पाय ठेवला आणि ५४ धावा केल्या. आम्हाला तुझा अभिमान आहे स्पायडी! 🫡

इंग्लिश सलामी फलंदाज क्राऊली-डकेट यांनी उत्तम सुरूवात करत १६६ धावांची भागीदारी केली आणि पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकलले.

या दोघांनी तिसऱ्या सत्रात बाद होताना वैयक्तिक अर्धशतके फटकावली. प्रथमच खेळायला उतरलेल्या अंशुल कंबोजने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट नोंदवली.

📝 स्टंप्स, दिवस २: इंग्लंड - २२५/(४६ धावा) १३३ धावांनी पिछाडी

दिवस तिसरा | धमाल सुरूच...

मैदानात समोर आव्हान कठीण असणे म्हणजे भारतीय क्रिकेट टीमला प्रत्येक विकेटसाठी मेहनत करण्याच

जो रूटने १५० धावा करताना विक्रम मोडीत काढले तर ओली पोपच्या ७१ आणि बेन स्टोक्सच्या नाबाद ७७ धावांनी त्यांच्या टीमला आघाडीवर आणले.

📝 स्टंप्स, दिवस ३: इंग्लंड - ५४४/(१३५ ओव्हर्स) १८६ धावांची आघाडी

दिवस चौथा | इंग्लंडला फायदा, पण विजय नजरेत नाही

ब्रिटिश संघाने आपली आघाडी ३११ धावांपर्यंत खेचली.. त्यामुळे पाहुण्या संघासमोर मोठे आव्हान होते. कर्णधार बेन स्टोक्सने अप्रतिम १४१ धावा केल्या आणि शेपटाने आपल्या बाजूने ६६९ /१० धावा नोंदवून मॅंचेस्टरवर कोणत्याही संघाने कसोटीत सर्वाधिक आघाडी नोंदवली.

भारतीय संघ फलंदाजीला उतरला तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये धावफलक ०/२ वर गेला. त्यामुळे कठीण परिस्थिती ओढवली. सुदैवाने केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी पहिला दिवस नाबाद अर्धशतके नोंदवून उत्तमरित्या संपवला.

📝 स्टंप्स, दिवस ४: भारत - १७४/(६३ ओव्हर्स) १३७ धावांची पिछाडी

दिवस पाचवा | शेवटी बरोबरी केलीच

कर्णधार गिलला प्रचंड वेदना होत असतानाही त्याने उत्तमरित्या शतक झळकवले. त्याने आपल्या कामगिरीची चुणूक संपूर्ण मालिकेत दाखवली.

जड्डू-वशीच्या सुंदर खेळामुळे धावांची कमतरता भरून काढली. भारतीय संघाला त्यामुळे चांगला दिलासा मिळाला.

त्यानंतर काहीच वेळात दोन्ही संघांनी अटीतटीने प्रयत्न केले. हा सामना अनिर्णित राहिला. खेळाच्या शेवटच्या तासात काही एनिमेटेड क्षण घडले. जडेजा (१०७*) आणि सुंदर (१०१*) यांनी शतके नोंदवली.

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे भारताला ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल, लंडनमध्ये सुरू होणाऱ्या शेवटच्या सामन्यात मालिका २-२ वर संपवण्याची संधी आहे.

**********

थोडक्यात धावसंख्या: भारत ३५८/१० (साई सुदर्शन ६१, बेन स्टोक्स ५/७२) आणि ४२५/४ (रवींद्र जडेजा १०७*, ख्रिस वोक्स२/६७) आणि इंग्लंड ६६९/१० (जो रूट १५०, रवींद्र जडेजा ४/१४३)