झिम्बाब्वे विरूद्ध भारत पहिला ओडीआयः भारताचा १० विकेट्सनी दणदणीत विजय

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरूद्ध दणदणीत १० विकेट्सनी विजय मिळवला असून त्यांनी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. 

शुभमन गिल (८२*) आणि शिखर धवन (८१*) यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. त्यामुळे भारताला ३०.५ ओव्हर्समध्ये १९० धावांचा पाठलाग करणे सहजशक्य झाले. आधीच्या इनिंगमध्ये दीपक चहर (३/२७), प्रसिद्ध कृष्णा (३/५०) आणि अक्झर पटेल (३/२४) यांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. 

ब्रॅड इवान्स आणि रिचर्ड गारावा यांच्यामध्ये विक्रमी नऊ विकेट्ससाठीची भागीदारी भारताला आश्चर्यचकित करणारी होती. परंतु भारताच्या फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या एकूणच कामगिरीमुळे त्यांना झिम्बाब्वेविरूद्ध १३ वा एकदिवसीय विजय प्राप्त करता आला. 

भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि आधी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. दीपक चहर फेब्रुवारीत पायाला दुखापत झाल्यानंतर प्रथमच भारताच्या खेळणाऱ्या संघात परतला आहे. 

झिम्बाब्वेचा कर्णधार रेगीस चकबावा नाणेफेक हरला. परंतु त्यालाही पिचवरील आर्द्रता पाहता प्रथम गोलंदाजी करायची होती असे लक्षात आले. कारण त्यामुळे सामन्याच्या पहिल्या तासात पटापट विकेट्स घेणे शक्य झाले असते. 

झिम्बाब्वेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांकडून आलेल्या सुरूवातीच्या ताणाचा सामना करत असताना दीपक चहरने सक्तीच्या पॉवर प्लेमध्ये इनोसंट काया (४) आणि ताडीवानाशे मारूमणी (८) या फलंदाजांची विकेट्स घेऊन भारतीय खेळाला दिशा मिळवून दिली. 

पहिल्या चार ओव्हर्समध्ये एकही विकेट मिळवता न आलेल्या मोहम्मद सिराजने १० व्या ओव्हरमध्ये सीय विल्यम्सची विकेट घेऊन आपले खाते उघडले. 

झिम्बाब्वेने ३१/३ च्या स्कोअरवर आपल्या पहिल्या १० ओव्हर्स पूर्ण केल्या. 

वेस्ली माधेवेरे दुसऱ्या टप्प्यातल्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. दीपक चहरने त्याला एलबीडब्ल्यूवर बाद केले आणि आपल्या खेळातील तिसरी विकेट घेतली. 

झिम्बाब्वेचा कर्णधार रेगीस चकबावा आणि सिकंदर रझा यांनी पाचव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करून यजमान संघाला ५० धावांपुढे नेले. 

रझाने बांग्लादेशविरूद्धच्या मालिकेत २५२ धावा केल्या. तो १२ धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाच्या पूर्ण लांबीच्या चेंडूने त्याच्या बॅटच्या कडेला स्पर्श केला आणि थेट स्लिपवर शिखर धवनच्या हातात गेला. 

झिम्बाब्वेचा संघ २८.३ ओव्हर्समध्ये ११०-८ वर आला. परंतु ब्रॅड इवान्स (३३ धावांमध्ये ३१) आणि रिचर्ड गारावा (३४ धावा) यांच्यादरम्यान झालेल्या विक्रमी ७० धावांच्या भागीदारीमुळे यजमान संघाला २०० पर्यंत पोहोचता आले. 

यजमान भारतीय संघातल्या गोलंदाजांसाठी झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या शेवटच्या फळीकडून झालेला संघर्ष आश्चर्यचकित करणारा होता. परंतु प्रसिद्ध कृष्णाचा राऊंड ऑफ दि विकेट यॉर्कर गारावाच्या पलीकडे जाऊन स्टंपवर आदळला आणि सामना पुन्हा भारताच्या दिशेने कलला. 

भारताने झिम्बाब्वेचा खेळ ४०.३ ओव्हर्समध्ये १८९ धावांवर गुंडाळला. अक्झर पटेलने विक्टर याऊचीची (८) विकेट घेतली. 

भारताने १८९ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या टप्प्यात ४३/० ची चांगली सुरूवात केली. त्यांनी १९.१ ओव्हर्समध्ये १०० धावा केल्या. शिखर धवनने आपले ३८ वे ओडीआय अर्धशतक पूर्ण केले. 

शुभमन गिलने त्याच्या शेवटच्या चार इनिंग्समध्ये तिसरे ओडीआय अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळामुळे भारताला २६ व्या ओव्हरमध्ये १५० धावा पूर्ण करता आल्या. 

गिल आणि धवन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली आणि भारताला १९० धावांचे लक्ष्य ३०.५ ओव्हर्समध्ये पूर्ण करता आले. 

झिम्बाब्वे आणि भारत आता शनिवारी २० ऑगस्ट रोजी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी आमनेसामने येतील.