MI x RO – वानखेडेवर विक्रमी रात्र
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियवर कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध पहिल्या सामन्यात मेजवानी मिळाली. ही संध्याकाळ सुंदर होती आणि या सामन्यात प्रत्येक विकेट महत्त्वाची होती. प्रत्येक शॉट महत्त्वाचा होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विक्रम पुन्हा लिहिले जाणार होते. पलटनचे काळीज असलेल्या एमआयने घरच्य खेळपट्टीवरच्या विजयात सहा विकेट्स घेतल्या.
या सामन्यात फक्त मोठी कामगिरी केली गेली नाही तर भरभरून केली गेली. फक्त कागदावर दिसणारी आकडेवारी एका शाश्वत प्रतिभेत रूपांतरित झाली. मागच्या १८ वर्षांच्या इतिहासाची उजळणी या निमित्ताने झाली. 💙
मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि त्याचे घरच्या खेळपट्टीशी असलेले खास नाते ही क्रिकेटमधली एक कविता आहे. हे मैदान त्याच्यामधील सर्वोत्तम बाहेर आणते. मैदानात हा खेळाडू फक्त खेळत नाही तर त्याचा गौरव साजरा केला जातो. 👑
रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान अत्यंत सुंदर नाते जपणारी आकडेवारी आपण पाहूया:
- रोहित शर्माने आपल्या ५० व्या आयपीएल अर्धशतकादरम्यान ७८ (३८) धावा केल्या.
- आयपीएल इतिहासात एकाच प्रतिस्पर्ध्याविरूद्ध म्हणजे केकेआरविरूद्ध सर्वाधिक म्हणजे ११६१ धावा केल्या.
- वानखेडेचा राजा असलेल्या रोहितने आयपीएलमधील आपल्या घरच्या खेळपट्टीवर २५०० धावा पूर्ण केल्या.
- त्याने फक्त २३ चेंडूंमध्ये सर्वाधिक वेगवान आयपीएल अर्धशतक पूर्ण केले.
- मुंबई इंडियन्सने आपल्या ३०० व्या टी२० सामन्यात विजय नोंदवला आणि हा टप्पा पार करणारी ती पहिली आयपीएल फ्रँचायझी टरली (आयपीएल आणि सीएलटी२० गेम्ससह).
- वानखेडेवर एमआयने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी पाठलाग पूर्ण केला.
- एमआयने वानखेडेवर केकेआरविरूद्ध ११ विजय नोंदवले आहेत. एकाच ठिकाणी एका प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध सर्वाधिक विजय नोंदवणारी ही आयपीएल टीम ठरली.
या सर्व धावा लक्षात ठेवल्या जातील. विक्रम नोंदवले जातील. परंतु ही अभिमानाची भावना, मोठ्या संख्येने मैदानात उतरण्याची आणि ब्लू अँड गोल्ड संघाला चिअर करण्याची इच्छाशक्ती कालातीत राहील!