मानलं रे भावा... ठाकूर! मुंबईच्या छोकऱ्याची घरी परतण्याची घोषणा
वानखेडे स्टेडियमवरची ती ताऱ्यांनी चमचमणारी रात्र आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूरने स्वतःचे स्थान पक्के केले. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 च्या या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. पी. ओ. टी. एम. लॉर्ड शार्दुल गरज होती तेव्हा उभा राहिला आणि त्याच्या खास स्टाइलमध्ये कामगिरी केली. यामुळे १४ वर्षांचे दुष्टचक्र भेदले गेले.
पहिल्यांदाच ब्लू अँड गोल्डमध्ये खेळायला उतरताना त्याने पलटनसाठी हा एक सामना निर्णायक ठरवला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 3/39 च्या आकड्यांसह पुनरागमन केले आणि विरोधी कर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर फिन एलन आणि कॅमेरून ग्रीन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
रणजीतल्या मुंबईच्या कर्णधाराने 2010 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेट गोलंदाज म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्याचे स्वप्न 2026 मध्ये शेवटी त्याच्या घरच्या मैदानावर, वानखेडेवर खरे ठरले. एका सपाट खेळपट्टीवर जिथे फलंदाज वर्चस्व गाजवणार होते तिथे, शार्दुलने उत्तम गोलंदाजी केली. त्याने केलेल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा तात्काळ फायदाही मिळाला.
First Match in Blue & Gold ✅
— Mumbai Indians (@mipaltan) March 30, 2026
POTM performance ✅ pic.twitter.com/CzgkH3ehW8
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात आपले विचार मांडताना शार्दुलने गोलंदाजी करताना आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले... केकेआरचे फलंदाज फटकेबाजी करत होते. "मी हे आधीही सांगितले आहे, मला आव्हाने आवडतात. मला गोलंदाजीत येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितींपैकी ही एक होती, विशेषतः सहाव्या ओव्हरमध्ये परिस्थिती गंभीर होती. बोल्ट, बुमराह आणि हार्दिकने सुरुवातीला गोलंदाजी केली. आम्हाला काही विकेट्सची अपेक्षा होती, पण आमच्यासाठी तसे झाले नाही. आव्हानांनीच मला कायम घडवले आहे. माझा आजचा खेळ एक नवीन अनुभव देणारा होता."
मागील काही वर्षांत वानखेडेवर गोलंदाजी करण्याबद्दल विचारले असता त्याने अनेक आठवणी सांगितल्या. "या मैदानाने मला कडून आणि गोड आठवणी दिल्या आहेत आणि आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना मला खूप आनंद होत आहे. मी नेट गोलंदाज आणि नवीन खेळाडू होतो. मी 2010 पासून तीन सीझनमध्ये टीमसोबत आहे. मी इथे शांतपणे माझे काम करत होतो. त्यामुळे मोठी संधी येणार हे मला माहीत होते."
आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि उर्वरित कारकीर्द फ्रँचायझीबरोबर राहण्याच्या हार्दिकच्या विनंतीला प्रतिसाद देण्याबाबत शार्दुलने खुलासा केला, "मला इथे खूप आनंद होतो. हे माझे घर आहे आणि मला इथे ज्या प्रकारे पाठिंबा मिळाला ते फारच अद्भुत होते. त्यामुळे, मला पाठिंबा दिल्याबद्दल, मला एलएसजीमधून इथे आणल्याबद्दल संपूर्ण मुंबई इंडियन्स कुटुंबाचा मी आभारी आहे."
कर्णधार हार्दिक पांड्यानेही संघात शार्दुलचे महत्त्व अधोरेखित केले आणि या जलदगती गोलंदाजाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. त्याने सांगितले की, "मी त्याला म्हटले की आता वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये जाणे पुरे झाले. आता उर्वरित करियरमध्ये तू इथे राहावंस असी माझी इच्छा आहे. तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याचे मन फार मोठे आहे. तो ज्या प्रकारे मैदानात उतरला आणि फलंदाजांवर मात करण्याचा प्रयत्न केला ते फारच सुंदर होते. शार्दुलने वानखेडेवर पहिल्याच सामन्यात फक्त विकेट्स घेतल्या नाहीत तर आपला ठसा उमटवला!