सामना 1 | MIvKKR: पहिल्या सामन्याचे दुष्टचक्र भेदायला सज्ज
पलटन, या आयपीएल २०२६ चा पहिला सामना खेळण्याची वेळ झाली आहे. मुंबई इंडियन्स आपला बालेकिल्ला असलेल्या वानखेडेवर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करेल. हे दोन दिग्गज आमनेसामने येतात तेव्हा मैदानात तूफान येते. रोमांचक फिनिश, कदाचित शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये सामना पलटू शकतो. मागील काही वर्षांमध्ये या दोन्ही संघांनी एकमेकांचा सामना केला तेव्हा नवीन हिरो समोर आले आणि त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. ब्लू अँड गोल्ड परिधान करणारे तरूण आणि अनुभवी या दोघांचाही समावेश या संघात असून ते अविस्मरणीय आठवणी देतात.
तर आता केकेआरविरूद्द एमआयच्या काही अविस्मरणीय आठवणींची उजळणी करूया:

रो-पॉली शो ची आठवण (२०१६)
२०१६ मध्ये पीओटीएम रोहित शर्माने ८ चेंडू आणि २ षट्कारांसह ४९ चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावा केल्या. एमआयने हा सामना १७८/४ चा पाठलाग करताना १२ चेंडू शिल्लक ठेवून ६ विकेट्सनी जिंकला. कायरन पोलार्डनेही ५१*(१७) धावा केल्या.
*****

ईडनवर हार्दिकचे शक्तिप्रदर्शन (२०१९)
हार्दिक पांड्याने २०१९ मध्ये फक्त ३४ चेंडूंमध्ये ९१ धावा फटकावल्या. त्याने ६ चौकार आणि ९ षट्कार ठोकून क्रिकेट वर्तुळाला गरागरा फिरवले. एमआयने केकेआरच्या २३२ च्या धावांचा पाठलाग जवळपास पूर्ण केला. एचपीने या सामन्यात केलेली तोडफोड अजूनही अंगावर काटा आणते.
*****

बूम बूमने पहिल्या सलग ५ विकेट्सची कामगिरी केली (२०२२)
जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२२ मध्ये केकेआरविरूद्ध आपल्या ४ ओव्हर्समध्ये (५/१०) ची कामगिरी केली जी त्या सीझनची सर्वोत्तम कामगिरी होती. जेबीने सामन्याच्या १८ व्या ओव्हरमध्ये सलग तीन विकेट्सही घेतल्या.
*****

वानखेडेवर एमआय विरूद्ध केकेआर सामन्यात अश्विनीचा शो (२०२५)
पलटन, आठवतं का? मागच्या वर्षी आपल्याला अश्विनी कुमार शो पाहायला मिळाला. त्याने ३ ओव्हर्समध्ये (४/२४) अशी देखणी गोलंदाजी करून पीओटीएम मिळवला. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चार विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. हा कमी धावांचा सामना जो एमआयने ८ विकेट्सनी जिंकला आणि आपले १२१/२ चे लक्ष्य फक्त १२.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केले. रिकल्टनने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ६२ धावा करून स्टार ठरला होता.
*****
आकडेवारी
|
खेळलेले सामने |
३५ |
|
एमआयने जिंकले |
२१ |
|
केकेआरने जिंकले |
१४ |
| MI | Stats | KKR |
| रोहित शर्मा (९६७ धावा) | सर्वाधिक धावसंख्या | व्यंकटेश अय्यर (३६५ धावा) |
| जसप्रीत बुमराह (२५ विकेट्स) | सर्वाधिक विकेट्स | सुनील नरीने (२६ विकेट्स) |
मोठे स्टेज आणि २०२६ साठी एक नवीन प्रकरण उदयास येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स समोरासमोर येतात तेव्हा मॅच नेहमीच जबरदस्त होते!