जस्सी घरी परतलाय!

By Mumbai Indians

तो आलाय. त्याचा ऑरा... त्याची व्हाइब. त्याची कामगिरी.

त्याचा धमाल रन अप.

त्याची ती खास उडी.

त्याचा तो लोडअप.

आणि बूम... तुमच्यासोबत नक्की काय झाले हे बूम अजिबात समजू देत नाही.. तुम्हाला फक्त एवढेच कळते की तुम्ही ड्रेसिंग रूमकडे परत चालला आहात.

"कुठेय तो?"

"अॅडमिन, तो कधी येणार आहे?"

"बुमराहची अपडेट?"

पलटन, आपला माणूस परतला आहे. भारताला सेमीफायनल्स आणि फायनल सामन्यात जरा आगळीवेगळी गोलंदाजी करून टी२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी केल्यानंतर, म्हणजे... अजून एक टी२० वर्ल्ड कप... तो संघात परतला आहे... ब्लू अँड गोल्डमध्ये आपला तोच जलवा दाखवायला तो तयार आहे.