“हार्दिकची लीडर म्हणून झालेली प्रगती आणि त्याची मॅच्युरिटी पाहून आनंद होतो”: महेला जयवर्धने
मुंबई इंडियन्सचा टाटा आयपीएल २०२६ चा पहिला सामना एक दिवसावर आला आहे आणि आम्ही आमच्या घरच्या मैदानावर-वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी दोन हात करायला तयार आहोत. स्पर्धेपूर्वी आमचे मुख्य प्रशिक्षक-महेला जयवर्धने यांनी एमआयच्या तयारीबाबत चर्चा केली. त्या चर्चेत फक्त संभाषण झाले नाही तर त्यांचा या संघाबाबतचा दृष्टीकोन, प्रेम आणि मेहनत त्यातून दिसून आली..
आपला विद्यमान कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्याच्या प्रगतीबाबत ते म्हणाले, "मी पहिल्यांदा हार्दिकला २०१७ साली भेटलो होतो. त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा, प्रतिभा आणि त्याचा उत्साह या गोष्टी आहेत. आजही त्याची ऊर्जा त्याला मैदानात वेगळे ठरवते. त्याचे क्रिकेटवर निरतिशय प्रेम आहे. त्याबद्दल तो भरभरून बोलतो. मी आठ वर्षांपासून मुंबई इंडियन्सबरोबर आहे आणि नेतृत्व, मैदानावरील परिपक्वता आणि त्याची प्रगती यांचा विचार केला तर हे सर्व अद्भुत आहे. तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे."
हार्दिकचे वेगळेपण सांगताना जयवर्धने यांनी त्याचे कौतुक केले. "त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला त्याला थोडे थांबवावे लागले कारण तो एका पॉवरहाऊससारखा होता. बॅट, बॉल आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्याची कामगिरी पहिल्यापासूनच उत्तम होती."
"नंतर त्याला झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या शरीरावर परिणाम झाला, कारण तो कसोटी क्रिकेटही खेळत होता. त्याला भार व्यवस्थापन करावे लागले. आता त्याला ही गोष्ट समजते आणि त्याच्यावरील भार हाताळण्याची एक योग्य पद्धतही त्याच्याकडे आहे. खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतील त्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला की त्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. त्याचे कौशल्य आणि कामाची पद्धत आजही उत्कृष्ट आहे... त्याचा सराव, सीझनमध्ये आणि नंतरही तंदुरुस्तीवर काम करणे खूप महत्त्वाचे ठरते. एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून त्याची प्रगती पाहताना मला खूप आनंद होतो."
पहिल्या सामन्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महेलाने ते अकरा खेळाडूंची योग्य ती रचना तयार करण्याबाबत चर्चा केली, "इतके चांगले पर्याय समोर असताना निवड करणे हे एक आव्हान आहे. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीनुसार खेळतो. एकदा आम्ही मुंबईत खेळलो की नंतर आम्हाला सलग 2 सामने बाहेर खेळायचे आहेत. आम्हाला त्यानुसार पर्यायांची निवड करायची आहे. टीमची खोली ही एक अशी गोष्ट आहे जी विविध कारणांसाठी खूप महत्वाची आहे. हीच गोष्ट दुखापतींसाठी किंवा वेगवेगळ्या परिस्थितींसाठी खरी ठरते... या गोष्टीवर आम्ही सातत्याने विचार करतो.
"सामना बाहेरून पाहण्याचा अनुभव मदत करतो. कधीकधी उत्तम खेळाडूंना बाहेर बसावे लागते. पण हा फ्रँचायझी क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकजण आनंदी असेल आणि संघाला एकत्र ठेवण्याच्या ध्येयाने खेळेल असे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
आता कोलकाता नाईट रायडर्स या टीमविरूद्ध एमआयची आकडेवारी उत्तम आहे. आपला पहिलाच सामना त्यांच्याविरूद्ध आहे. 2012 नंतर मुंबई इंडियन्सला सीझनचा पहिला सामना जिंकता आलेला नाही, हेही वास्तव आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षकांनी याबाबत महत्त्वाची चर्चा केली. आता २९ मार्च २०२६ चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
"आमच्यासाठी वेगळी तयारी करायची गरज वाटत नाही. पहिल्या सामन्याचे महत्त्व मी टीमला सांगितले आहे. तेवढेच आपण नियंत्रित करू शकतो. मी फक्त खेळाडूंना उत्तम क्रिकेट खेळण्यास सांगितले आहे. आशा आहे की त्यांना हे दुष्टचक्र भेदता येईल", असे ते म्हणाले.
"मागे काय घडले याचा विचार करणे महत्त्वाचे वाटत नाही. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचे खेळाडू आले आहेत. ही नोंद आपण चांगल्या गोष्टी करत आहोत हे दाखवते. पण एका चांगल्या टीमला पराभूत करण्यासाठी आम्हाला ते करणे आवश्यक आहे आणि आम्हाला माहीत आहे की केकेआर हा एक चांगला संघ आहे. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. मागे काय घडले त्याबाबत मला फार विचार करायचा नाही. आम्ही तयारी केली आहे आणि पहिल्या सामन्यासाठी तयार आहोत.