तेंडुलकर-स्मिथपासून रोहित रिकल्टनपर्यंत- एमआयसाठी इतिहासातील सर्वांत मोठ्या भागीदारींचा उत्सव

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझी जगात भागीदारी म्हणजे दोन व्यक्तींनी केलेल्या धावांपुरत्याच मर्यादित नसतात. तो खऱ्या अर्थाने ठेवलेला विश्वास असतो. मागील १८ सीझन्समध्ये एमआयच्या प्रतिभावान फलंदाज जोड्यांनी प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजीला खिंडार पाडले आहे. त्याचा पाया रचणाऱ्या महान खेळाडूंपासून ते हा वारसा पुढे चालवणाऱ्या पुढील पिढीपर्यंत... पाच वेळा आयपेल चॅम्पियन्स झालेल्या खेळाडूंचा हा इतिहास खूप मोठा आहे.

टी२० मध्ये मागील काही वर्षांत मुंबई इंडियन्सच्या टॉप चार भागीदारींचा आढावा घेऊया.

१६७- रोहित शर्मा आणि हर्शेल गिब्स, कोलकाता, २०१२

आपला लाडका हिटमॅन आणि हर्शेल गिब्स या दोघांनी १२ मे २०१२ रोजी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १६७ धावा केल्या आणि दर्जेदार फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीला भेदले. एमआयने तो सामना ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध २७ धावांनी जिंकला. याच ठिकाणी आपल्या मुंबईचा राजा रोहित शर्माने ६० चेंडूंमध्ये नाबाद १०९ धावा करून पहिले आयपीएल शतक नोंदवले तर गिब्सने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ६६ धावा केल्या. यामुळे सलग सात सामन्यांत केकेआरने नोंदवलेल्या सलग विजयांची ओळ भंगली.

१६३- ड्वायने स्मिथ आणि सचिन तेंडुलकर, जयपूर २०१२

आपला मुंबईचा तारा सचिन तेंडुलकर आणि पीओटीएम ड्वायने स्मिथ यांनी २० मे २०१२ रोजी जयपूर येथे सलामीच्या भागीदारीसाठी नाबाद १६३ धावा फटकावल्या. आपल्या मास्टर ब्लास्टरने ५१ चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा केल्या तर स्मिथने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावा करून प्रतिस्पर्ध्यांना गारद केले. एमआयने हा सामना १२ चेंडू शिल्लक असताना १० विकेट्सनी जिंकला. एमआयने सचिन-स्मिथला सलामीसाठी पाठवले तेव्हा आरआर आश्चर्यचकित झाले. त्या सीझनमध्ये एमआयने आठव्या वेळी एक वेगळी रचना सलामीसाठी पाठवली होती.

१४८- रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन, मुंबई २०२६

एमआयने २९ मार्च २०२६ रोजी पहिला सामना ६ विकेट्सनी जिंकून १४ वर्षांचे दुष्टचक्र भेदले. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या सलामी भागीदारीतील १४८ धावा वानखेडे स्टेडियवर केकेआरविरूद्ध टी२० सामन्यात एमआयसाठी तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या. रोहितने ३८ चेंडूंमध्ये ७८ धावा करून नौका सावरली तर रिकल्टनने ४३ चेंडूंमध्ये ८१ धावा फटकावल्या. अनुभव आणि क्लास या दोन्ही गोष्टी या वेळी पलटनला पाहायला मिळाल्या.

१४३- सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, मुंबई २०२४

मि. ३६० सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे एमआयला ६ मे २०२४ रोजी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सात विकेट्सनी विजय मिळवता आला. स्कूप्स, स्वीप्स, फ्लिक्स आणि षट्कार हेच या वेळच्या शोचे हायलाइट होते. पीओटीएम सूर्यादादाने ५१ चेंडूंमध्ये १०२ धावा केल्या. टीव्हीने ३२ चेंडूंमध्ये ३७ धावा करून त्याला चांगला पाठिंबा दिला. आता टी२०मध्ये एमआयसाठी चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची भागीदारी आहे.

एमआयची प्रत्येक महान गोष्ट एका सुंदर भागीदारीपासून सुरू होते जिने प्रतिस्पर्धी संघाला सीमापार टोलवले आहे.