
रोहित शर्माचं कौतुक करण्याची १०००० कारणं
दमदार, जोरदार, सामना जिंकून देणारा, क्लासी, मेहनती, कर्णधार, नेता, आदर्श, महान खेळाडू.... रोहित शर्मा क्रिकेट जगतासाठी काय होता आणि आहे सांगण्यासाठी कितीही विशेषणं वापरली तरी ती कमीच पडतील.
मुंबईचं जगप्रसिद्ध ‘खडूस’ क्रिकेट खेळत २००० च्या सुरूवातीला हा खेळाडू एक स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरला. तेव्हापासून ते २०२३ पर्यंत ज्याच्या मेथॉडिकल सर्वोत्तमतेचं प्रतीक होईपर्यंतचा हिटमॅनचा प्रवास. तो आता १०,००० किंवा त्यापेक्षा अधिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावां आपल्या नावावर करणाऱ्या महान खेळाडूंच्या यादीत आला आहे.
हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वेगवान (फलंदाजी केलेल्या इनिंग्सच्या संदर्भात- २४१ इनिंग्स)- सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतरचा सहावा आणि ५० ओव्हर्स क्रिकेटच्या १० हजार धावा आपल्या नावावर नोंदवणारा १५ वा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याने हा मान पटकावला आहे.
चला तर मग या महान खेळाडूच्या १०,००० ओडीआय धावा पाहूया. घड्याळाचे काटे उलटे फिरवून कालगती मागे नेऊया. चला मग.
नोंद घ्या: तब्बल पाच वेळा आपल्या भारतीय कर्णधाराचा खेळ एका दिग्गज प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध बहरलाय.
पहिल्या ओडीआय सामन्यापासून रोहित शर्माच्या महत्त्वाच्या धावा |
|||
धावा |
प्रतिस्पर्धी |
सामना क्र. |
दिनांक |
डीएनबी |
आयर्लंड |
पहिला |
२३ जून ०७ |
पहिली धाव |
दक्षिण आफ्रिका |
२ |
२६ जून ०७ |
१००० |
श्रीलंका |
४६ |
५ जून १० |
२००० |
इंग्लंड |
८७ |
२३ जाने. १३ |
३००० |
ऑस्ट्रेलिया |
१०८ |
२ नोव्हेंबर १३ |
४००० |
आयर्लंड |
१३२ |
१० मार्च २०१५ |
५००० |
ऑस्ट्रेलिया |
१४८ |
२३- जानेवारी १६ |
६००० |
ऑस्ट्रेलिया |
१६८ |
१- ऑक्टोबर-१७ |
७००० |
पाकिस्तान |
१८७ |
२३-सप्टेंबर-१८ |
८००० |
ऑस्ट्रेलिया |
२०६ |
१३ मार्च १९ |
९००० |
ऑस्ट्रेलिया |
२२४ |
१९ जानेवारी- २० |
१०,००० |
श्रीलंका |
२४८ |
१२ सप्टें.-२३ |