News

घोषणा: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२३ विश्वचषक संघाची घोषणा

By Mumbai Indians

घोषणा झालीय. चार वर्षांचे सातत्यपूर्ण नियोजन आणि विविध रचनांच्या प्रयोगांनंतर अंतिम १५ खेळाडूंची घोषणा झाली आहे. इतिहास निर्माण करायची वेळ झालीय. आता रोहित शर्मा कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या पंगतीत जाऊन बसायला सज्ज आहे.

 1. रोहित शर्मा (कर्णधार)
 2. हार्दिक पंड्या (उपकर्णधार)
 3. शुभमन गिल
 4. विराट कोहली
 5. श्रेयस अय्यर
 6. सूर्यकुमार यादव
 7. ईशान किशन (विकेट कीपर)
 8. केएल राहुल (विकेट कीपर)
 9. रवींद्र जडेजा
 10. शार्दुल ठाकूर
 11. अक्झर पटेल
 12. जसप्रीत बुमरा
 13. मोहम्मद सिराज
 14. मोहम्मद शामी
 15. कुलदीप यादव

भारतातील १० विविध शहरांमध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक महिन्यापेक्षा जास्त काळ शिल्लक आहे.

हिटमॅन, आपला कर्णधार, आपला नेता रोहित शर्मा सध्या आशिया कप २०२३ मध्ये खेळत असलेल्या १८ सदस्यांच्या टीममधून निवडलेल्या १५ खेळाडूंच्या टीमचे नेतृत्व करणार आहे. हा संघ तिसरा विश्वचषक जिंकण्यासाठी आणि ५० ओव्हर्स क्रिकेटमध्ये १२ वर्षांची प्रतीक्षा संपवण्यासाठी सज्ज आहे.

शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे रोहितसोबत भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी तयार असून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघे दुखापतीतून परतल्यामुळे आपली फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.

हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्झर पटेल आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतील. या चौघांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली आहे आणि त्यांना घरच्या खेळपट्टीवर मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे ते खेळपट्टीवर आपली जादू नक्कीच चालवतील.

जसप्रीत बुमराने २०१९ च्या क्रिकेट विश्वचषकात नऊ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. तो आपले जोडीदार मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज जलदगती गोलंदाजीचा भार सांभाळतील तर कुलदीप यादव जडेजा आणि अक्झरसोबत स्पिनर्सची धुरा उचलेल.

आपण या शब्दाकडे परत आलोय- बिलीव्ह. चला तर मग चषक घरी आणूया आणि संपूर्ण जगाला निळ्या रंगात रंगवूया.