विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६: मुं-भाईचे खेळाडू चमकण्यासाठी तयार
देशांतर्गत क्रिकेटचा उत्सव आता सुरू होतोय. मुंबईचे काही खेळाडू आगामी विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तयार आहेत.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचा रोमांच संपल्यानंतर आता स्पॉटलाइट खेळाच्या दीर्घ स्वरूपावर आहे. मेन इन ब्लू संघ २०२४-२५ मधल्या खेळाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहे.
आपल्या लाडक्या लॉर्ड शार्दुलने नागालँडविरूद्ध २८ चेंडूंमध्ये ७३ धावा फटकावल्या होत्या. त्याने मुंबईच्या टीमचे नेतृत्वही केले होते. 🤘
रोहित आणि सूर्यादेखील मुंबईच्या वतीने मैदानात उतरणार असून ते प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत. आपला स्काय ३६० नाबाद धावांचे प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक असून हिटमॅन २०१८ नंतर प्रथमच सामन्यात खेळणार आहे.
नमन धीर आणि रघू शर्मा यांनी मागच्या सीझनमध्ये आठ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या. महाराष्ट्रविरूद्ध उपउपांत्य सामन्यात हरल्यानंतर आता एक पाऊल पुढे जाऊन पंजाबला उपांत्य सामन्यात नेण्यासाठी आतुर आहेत.
दरम्यान, मागच्या पाच टी२० इनिंग्समध्ये तीन अर्धशतके फटकावलेल्या कुंग फू पांड्या (पंजाबविरूद्ध स्मॅट सामन्यात नाबाद ७७ धावांसह) पहिली ट्रॉफी उचलण्यासाठी उत्सुक असलेल्या बडोद्याच्या संघात महत्त्वाची कामगिरी बजावण्यासाठी सज्ज आहे. 😎
आता येत्या ५० ओव्हर्सच्या स्पर्धेत रॉबिन मिंझ सध्याच्या एसएमएटी चॅम्पियन झारखंडचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. स्पर्धेत १६६ धावा करणारा हा तरुण खेळाडू मैदानावर एमआय काय असते हे दाखवण्यासाठी आणि त्याच्या वाढत्या कारकिर्दीत एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक असेल.
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे खालील खेळाडू सहभागी होतील.
|
खेळाडू |
टीम |
ग्रुप |
|
रॉबिन मिन्झ |
झारखंड |
ए |
|
हार्दिक पांड्या |
बडोदा |
बी |
|
सूर्यकुमार यादव |
मुंबई |
सी |
|
रोहित शर्मा |
मुंबई |
|
|
शार्दुल ठाकूर |
मुंबई |
|
|
नमन धीर |
पंजाब |
|
|
रघू शर्मा |
पंजाब |
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ बुधवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सुरू होणार असताना तुम्हाला काय करायचेते माहीत आहेः आपल्या मुलांना पाठिंबा द्या. त्यांचा उत्साह वाढवा. 🤝