अंधेरी पूर्वेकडून वानखेडेपर्यंतः अथर्वच्या यशोगाथेचे वर्तुळ पूर्ण
मुंबईत नेहमीच एक अशी यशोगाथा लिहिली जाते ती अशक्यप्राय वाटते. ही कथा अंधेरी पूर्वेतल्या एका शांत घरात सुरू झाली आणि वानखेडेवरच्या झगमगाटापर्यंत आली.
अथर्व अंकोलेकरचा प्रवास विश्वास, त्याग आणि आपल्या आरामदायी आयुष्यापेक्षा स्वप्नाची निवड करणाऱ्या कुटुंबापासून सुरू झाला. तो फक्त १९ वर्षांचा होता पण स्वप्ने लहान नव्हती.
त्याच्या कुटुंबात क्रिकेटचे वेड होते. त्याचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टच्या विद्युत विभागात काम करताना मुंबईच्या ख्यातनाम कांगा लीगमध्ये जॉली क्रिकेटर्ससाठी खेळत होते. बेस्ट क्रिकेट टीमचा स्टार असलेल्या गोल बंड्याच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव बंड्या असे ठेवले.
आणि नंतर सुरू झाला हा प्रवास. कामावरची रात्रपाळी, दुपारचा सराव आणि सकाळी शाळा या वर्तुळात अथर्वचे आयुष्य एकाच स्वप्नामागे धावत होते. एका परीक्षेपासून दुसऱ्या परीक्षेपर्यंत त्याचे टॅलेंट सर्वांना दिसत होते परंतु अडथळेही खूप होते. अथर्व क्रिकेटच्या मैदानासाठीच बनलाय हा विश्वास मात्र कायम होता.
हे स्वप्न मुंबईच्या मैदानांवर उलगडण्यास सुरूवात झाली. शालेय क्रिकेट. क्लबच्या स्पर्धा. निवड चाचण्या. अथर्वच्या अष्टपैलू क्षमता दिसून येऊ लागल्या आणि विनोद मंकड ट्रॉफीमधली त्याची कामगिरी त्याला राष्ट्रीय वयोगटात घेऊन गेली.
त्याने २०१९ मध्ये भारताच्या बी टीमचे यू १९ चॅलेंजर ट्रॉफीमध्ये उत्तम खेळ केला. त्यानंतर मुंबईच्या यू-२३ संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर त्याला कॉल आला. इंडिया यू-१९. श्रीलंकेतला आशिया कप.
अथर्व फक्त खेळला नाही तर त्याने करून दाखवले. त्याने पाकिस्तानविरूद्ध ३/३६ ही कामगिरी तर अफगाणिस्तानविरूद्ध ४/१६ ची कामगिरी.
त्यानंतर आला अंतिम सामना. त्या वेळी प्रचंड तणाव होता. अथर्व अंकोलेकर पाच विकेट्स घेऊन त्या तणावातून बाहेर आला. त्याने २८ धावांमध्ये ५ विकेट्स घेतल्या. आपण चषक जिंकला. त्याला सामनापटूचा पुरस्कारही मिळाला. हा तरूण मुंबईकर सर्वाधिक गरज असताना उत्तुंग उभा राहिला.
त्याला लवकरच ब्लू अँड गोल्डकडे यावे लागणार होते. २०२० मध्ये अथर्व नेट गोलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. त्याने पाहिले, अभ्यास केला आणि शिकून घेतले. त्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नव्हते.
आता ही प्रतीक्षा संपली आहे. मुंबईच्या लाडक्या खेळाडूला आयपीएल २०२६ साठी साइन करण्यात आले आहे. 👊
आयुष्याचे वर्तुळ वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण होते. अथर्व अंकोलेकरचा हा प्रवास त्याची निष्ठा, त्याग आणि या विश्वास तसूभरही कमी होऊ न देणाऱ्या शहराने प्रेरित आहे.
स्वागत आहे, बंड्या.
पलटन आपल्या लाडक्या खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी सज्ज आहे. 🤗💙