News

२०२६ चा एमआयचा संघ = सज्ज!!!

By Mumbai Indians

संघ तयार आहे. व्हाइब जबरदस्त आहे. तर पलटन आपल्या मुंबई... मुंबई... जयघोषासाठी तयार राहा! 💙

आपण आयपीएल २०२६ चा लिलाव स्टाइलमध्ये पूर्ण केला आहे. संतुलन, विश्वास आणि सामन्यासाठी आवश्यक ऊर्जेने परिपूर्ण असलेला संघ तयार करण्यासाठी आपण पाच खेळाडूंना एकत्र आणले आहे. आपल्या ओळखीचे चेहरे परत आणण्याइतका आनंद दुसऱ्या कशात असू शकतो बरं?!

सर्वप्रथम म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे क्विंटन डे कॉकचे! 🔥 क्यूडीकेला १ कोटी रूपयांच्या मूळ किमतीत आपल्याकडे आणण्यात आले असून हे होणारच होते.

आपल्या २०१९ आणि २०२० चॅम्पियनशिप विजेत्या टीमचा लाडका सदस्य, त्या दोन वर्षांत हा विकेट कीपर फलंदाज एक वॉकिंग हायलाइट रील ठरला. धमाकेदार सलामीपासून ते तणावाखाली सामना बदलणाऱ्या दणकेबाज कामगिरीपर्यंत, तो जेव्हा जेव्हा मैदानात उतरला तेव्हा आपल्यासाठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला.

…हिटमॅनसोबतची सलामीची भागीदारी तर विसरूच नये. अत्यंत सुंदर खेळ. क्विनीच्या हृदयात आग आणि धावा- विकेट्सची भूक त्याला आपल्यासाठी सहाव्या ट्रॉफीच्या प्रयत्नात एक उत्तम खेळाडू ठरवते.

त्याच्यासोबत आणखी चार मूळ किमतीतील खेळाडू आहेत आणि ते सगळेच खास कौशल्ये घेऊन येत आहेत. दनिश मालेवार, मोहम्मद इझर, अथर्व अंकोलेकर आणि मयंक रावत हे सगळेच ३० लाख रूपयांत आपल्याकडे आले आणि विश्वास ठेवा- या सर्वांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. ऊर्जा, भूक आणि वैविध्यपूर्णता? हे सगळेच त्यांच्यामध्ये आहे. एमआयचे स्वप्न जगण्यासाठी तयार असलेल्या अथर्व अंकोलेकरचे खास स्वागत आहे.

आता हे शेवटचे खेळाडू एकत्र आल्यामुळे आयपीएल २०२६ साठी #OneFamily पूर्णपणे तयार आहे. आपला हेतू स्पष्ट आहे आणि प्लॅन सरळ आहे:

#6. यापेक्षा कमी नाही.

मुंबई इंडियन्स - आयपीएल २०२६ संघ

राखलेले खेळाडू: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिक्लेटन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, नमन धीर, विल जॅक्स, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गफनझर, अश्वनी कुमार, दीपक चहर.

देवाणघेवाण केलेले: शार्दुल ठाकूर, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे

आयपीएल २०२६ लिलावात आपल्याकडे आलेले: क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इझर, अथर्व अंकोलेकर आणि मयंक रावत