“पहिल्या फळीत प्रचंड अनुभवाने समृद्ध क्विंटन असल्याचा आनंद आहे”: जयवर्धने
तुमचा हॅप्पी डान्स कसा सुरू आहे पलटन? २०१९ आणि २०२० मधला चॅम्पियन इन ब्लू अँड गोल्ड, एक असा खेळाडू ज्याच्या फ्लिक षट्कारांनी आपल्याला मंत्रमुग्ध केले, एक कीपर ज्याच्या खेळामुळे स्टंप्सच्या मागे एक बालेकिल्ला उभारला गेला, चाहत्यांचा लाडका खेळाडू, अत्यंत लोकप्रिय क्विंटन डे कॉक परतलाय!
रोहित शर्मा आणि क्विंटन डे कॉक सलामीसाठी खेळायला मैदानात उतरले की वानखेडेवर दंगा होतो. 🔊
c क्विंटन बी बुमराह 💙
c क्विंटन बी बोल्ट 💙
तुम्ही हे पाहिलेच असेल. नॉस्टॅल्जिया होतोय की नाही!
“क्विनी हा आमच्यासाठी एमआयचा भाग बऱ्याच काळ होता. अगदी पूर्वीही होता,” असे मत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. “पहिल्या फळीत महत्त्वाच्या टप्प्यात खोली असावी असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आमच्या खेळाडूंना जरा लवचिकता मिळेल. आता त्याच्याकडे तो अनुभव असल्याने तो आमच्यासोबत आलाय याचा आनंद वाटतो.”
मुंबई इंडियन्सचे परदेशी आयपीएल २०२६ साठी खेळतील तेव्हा खूप मजा येईल. संघ ज्या प्रकारे तयार होतोय त्याने जयवर्धने खूप आनंदात दिसले. मागच्या वर्षापासून सातत्यपूर्णता आहे आणि आठवणींना उजाळाही आहे.
“मागच्या वर्षी आम्ही खूप खूश होतो. एकीकडे आमच्या खेळाडूंना दुखापतग्रस्त व्हावे लागले. त्यामुळे आमच्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ पूर्ण होऊ शकला नाही. आम्हाला या ठिकाणी दुरूस्ती करायची होती.
“आमच्याकडे असलेल्या खेळाडूंसह आम्ही लिलावात जाण्यापूर्वी हे अंतर सांधण्याचा प्रयत्न केला. आता आमच्यासोबत जे काही खेळाडू आहेत त्याने आम्ही खूप खूश आहोत. पुढच्या तीन महिन्यांत काही दुखापती झाल्या नाहीत तर सोन्याहून पिवळे होईल कारण अनेक स्पर्धा बाकी आहेत.”