
आशिया कप २०२५, INDvOMA: थोडीशी धाकधूक, पण भारताचा रथ विजयी मार्गावरच
तीन सामन्यांमध्ये तीन विजय? होय तर.
एका रोमांचक सामन्यात सूर्यादादा आणि कंपनीने ओमानवर २१ धावांनी विजय मिळवून सुपर फोर्ससाठी उत्तम तयारी केली.
अबूधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यांबद्दल जाणून घ्यायचंय का? वाचत राहा…
अभिषेक, संजूची आतषबाजी 💥💥
सर्वप्रथम फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतलेल्या या नंबर १ टी२०आय फलंदाजाने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करून १५ चेंडूंमध्ये ३८ धावा फटकावल्या.
त्यानंतर संजू सॅम्सनने इनिंगचा पाया मजबूत रोवून ठेवला आणि टीमने १० ओव्हर्समध्ये १००/३ धावा पूर्ण केल्या.
या उजव्या हाताच्या फलंदाजाने १८ ओव्हरमध्ये बाद होण्यापूर्वी ४५ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. त्याला तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी चांगली साथ दिली.
अक्षर, टीव्ही यांची चांगली धावसंख्या
अक्षर पटेलने २६ धावा केल्या तर आपल्या वर्माजींनी आणखी २९ धावा फटकावल्या. भारताची धावसंख्या २० ओव्हर्सच्या शेवटी १८८/८ झाली.
पाठलागाला उत्तम सुरूवात
With 189 in sight, Oman openers stitched a decent 56-run partnership before Kuldeep Yadav finally got rid of their skipper Jatinder Singh for 32 in the ninth over.
At the halfway mark, the game stood evenly poised, even though Oman needed 127 runs to win with nine wickets in hand.
ओमानची कडवी झुंज
मधल्या फळीत आमीर कलीमसोबत हम्मद मिर्झा खेळायला आला तेव्हा भारतीय गोलंदाजही थोडे बॅकफूटवर गेले. या दोघांनी मधल्या फळीतल्या ओव्हर्समध्ये फक्त चौकार, षट्कार ठोकले.
कलीमने १६ व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि परिस्थिती गंभीर दिसत असताना कुंग फू पांड्याने फाइन लेगवर एक विकेट घेऊन सामना भारताच्या ताब्यात आणला.
१२ चेंडूंमध्ये ४० धावांची गरज- भारताने शेवटी विजय मिळवलाच
आमीर कलीमची ती विकेट पडली आणि सामना आपल्या अजिंक्य टीमच्या हातात आला.
याशिवाय अर्शदीप सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये विनायक शुक्ला बाद झाल्यानंतर आपल्या १०० टी२०आय विकेट्स पूर्ण केल्या. हा टप्पा पार करणारा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
Ainvayi thodi kehte hain 𝙎𝙞𝙣𝙜𝙝 𝙞𝙨 𝙆𝙞𝙣𝙜 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) September 19, 2025
Ye milestone bhi viral hai, Paaji! 😎 pic.twitter.com/suXvBQ63ik
अंतिमतः भारतीय क्रिकेट टीम २१ धावांनी विजयी झाली आणि भारतीय गोटात आनंदाची लहर पसरली.
**********
थोडक्यात धावसंख्या: भारत १८८/८ (संजू सॅम्सन ५६, शाह फैजल २/२३) कडून ओमानचा २१ धावांनी पराभव १६७/४ (आमीर कलीम ६४, कुलदीप यादव १/२३).