News

मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

By Mumbai Indians

जवळपास ४०० पेक्षा जास्त फटकावल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा चार विकेट्सनी पराभव करून पहिला टी२०आय सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली.

सुरूवातीला कॅमेरॉन ग्रीन मास्टरक्लास आणि त्यानंतर मॅथ्यू वेडची धमाकेदार कामगिरी यांच्यामुळे कांगारूंनी शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये ५३ धावा टोलवल्या आणि भारताविरूद्ध टी२०आय मध्ये सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग नोंदवला.

भारतासाठी हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यांच्या सुंदर खेळीमुळे भारताला २० ओव्हर्समध्ये २०८/६ धावा करता आल्या.

या सामन्याची सुरूवात मॅथ्यू वेडने मुंबी इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिडला ऑस्ट्रेलियासाठी पहिली आंतरराष्ट्रीय कॅप देऊन झाली.

दरम्यान टीम इंडियाच्या पहिल्या ११ खेळाडूंच्या संघात ऋषभ पंत आणि आघाडीचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनी अनुक्रमे दिनेश कार्तिक आणि उमेश यादव यांच्यासाठी जागा करून दिली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि एक षटकार फटकावला. त्यानंतर त्याने पुढच्या ओव्हरमध्ये एक चुकीचा फटका मारला आणि ऑस्ट्रेलियाला आपली पहिली विकेट मिळवून दिली.

भारताने त्यानंतर लवकरच आपला दुसरा मोहरा गमावला. विराट कोहलीला नॅथन एलिसने आपल्या गोलंदाजीवर अचूक टिपले. आपल्या विराटने एलिसच्या गोलंदाजीवर खेळताना चेंडू कॅमेरॉन ग्रीनच्या हातात सोपवला आणि त्यामुळे त्याच्या ७ चेंडूंची इनिंगचा समारोप झाला.

पॉवरप्ले संपत असताना भारताला ४६/२ धावा करता आल्या. परंतु भारताचे दोन्ही महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते.

कांगारूंना त्यांच्या चांगल्या सुरूवातीचा फायदा उचलता आला नाही. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेनंतर इनिंगचा ताबा घेतला. त्यांनी विरोधी गोलंदाजांचा समाचार घेतला.

केएल राहुलने ११ व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तो पुढच्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूडकडून ३५ चेंडूंमध्ये ५५ धावा करून बाद झाला. त्यामुळे यजमान संघाला १०० धावांचा टप्पा पूर्ण करता आला.

धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम ठेवत २५ चेंडूंमध्ये ४६ धावा काढल्या आणि स्कोअरबोर्ड हलता ठेवला.

भारताने शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये इनिंगचा वेग वाढवला आणि आव्हानात्मक २०८/६ धावा पूर्ण केल्या. हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक विक्रमी खेळ ठरला. त्याचे कारण हार्दिक पंड्याने जोरदार ३१ चेंडूंमध्ये ७० धावा पूर्ण केल्या.

ऑस्ट्रेलियन इनिंग्सच्या सुरूवातीला एरॉन फिंचने चमकदार सुरूवात केली. त्यानंतर तो अक्झर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाहुण्या संघाने पॉवर प्लेमध्ये ६०/१ धावा केल्या. त्यांनी यजमान संघाला तणावाखाली ठेवत प्रत्येक ओव्हरमध्ये १० धावा केल्या.

अक्झर पटेलने धोकादायक ठरणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनचा झेल आठव्या ओव्हरमध्ये सोडला. त्यामुळे भारताची सामना ताब्यात घेण्याची सुवर्णसंधी सुटली.

भारतीय संघ फील्डवर चाचपडत असताना केएल राहुलने स्टीव्ह स्मिथला बाद करण्याची संधी गमावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९.२ ओव्हर्समध्ये १०० धावा पूर्ण करता आल्या.

परंतु अक्झर पटेलने आपल्या सोडलेल्या कॅचची भरपाई करत कॅमेरॉन ग्रीनच्या रूपात आपली दुसरी विकेट घेतली. त्यामुळे भारताला पुन्हा जिंकण्याची आशा निर्माण झाली.

स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे उमेश यादवच्या नंतरच्या ओव्हरमध्ये बाद झाल्यामुळे सामन्यात दमदार पुनरागमन केले. रोहित शर्माने दोन रिव्ह्यू घेतले. त्यामुळे अंपायरला आपला आधीचा निर्णय बदलावा लागला.

अक्झर पटेलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या स्कोअरिंगचा दर कमी करताना जोश इंग्लिसची महत्त्वाची विकेट घेतली.

सामना शेवटच्या टप्प्यात असताना ३५ चेंडूंमध्ये ६४ धावा शिल्लक होत्या. त्यामुळे सामन्याचे संतुलन बदलले.

परंतु मॅथ्यू वेडने कांगारूंना शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये ५३ धावा फटकावून विजयाच्या जवळ जाण्यास मदत केली. पॅट कमिन्सने शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार फटकावला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी एक अविस्मरणीय विजय प्राप्त करणे शक्य झाले.

भारत आता २३ सप्टेंबर रोजी नागपूर येथील दुसऱ्या टी२०आयमध्ये खेळात जोरदार पुनरागमन करेल.

थोडक्यात धावसंख्या: भारताचा २०८/६ (हार्दिक पंड्या ७१*, नॅथन एलिस ३/३०) ऑस्ट्रेलियाकडून २११/६ (कॅमेरॉन ग्रीन ६१, अक्झर पटेल ३/१७) चार विकेट्सनी पराभव