News

AUSvIND, दुसरा टी२०आय सामना: अरेरे... ऑसीजची १-० ची आघाडी

By Mumbai Indians

हा दिवस टीम इंडियासाठी खूप आव्हानात्मक होता. आपण मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना चार विकेट्सनी पराभूत झालो.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघासाठी अभिषेक शर्माने ३७ चेंडूंमध्ये ६८ धावांची कमाल कामगिरी केली. त्याने टीमला १८.४ ओव्हर्समध्ये १२५/१० पर्यंत नेले. त्यानंतर यजमान संघाने दिलेले लक्ष्य १४ ओव्हर्समध्ये पूर्ण केले.

एमसीजीवर हा सामना काहीसा असा झाला.

अभिषेक शर्माची आतषबाजी

आपल्या या खेळाडूने पुन्हा एकदा खेळाच्या सर्वांत छोट्या स्वरूपात आपण नंबर १ चे फलंदाज का आहोत हे सिद्ध केले.

तो पहिल्यापासूनच तूफान फटकेबाजी करत आला आणि त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना ३७ चेंडूंमध्ये ६८ धावा करत फटकावले. त्याने आठ चौकार आणि दोन षट्कार मारले.

हर्षित राणाची मदत

पाहुण्या संघाच्या विकेट्स वेळोवेळी पडत होत्या. परंतु हर्षितने महत्त्वाच्या धावा करून आपला डाव सावरला.

या उजव्या हाताच्या फलंदाजाला वरच्या फळीत नेण्यात आले होते. त्याने ३३ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या आणि भारतीय संघाचा धावफलक १२५/१० पर्यंत आला.

ऑसीजनी सामना जिंकला

समोर १२६ धावांचे लक्ष्य असताना मार्श-हेडच्या जोडीने अप्रतिम सुरूवात करून दिली.

ट्राविस हेड १५ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्यानंतर आपल्या स्टारबॉयने त्याची सुंदर कॅच घेऊन त्याला बाद केले. परंतु मार्शने फटकेबाजी सुरू ठेवत २६ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या.

धावफलक ९०/३ वर असताना १० पेक्षा जास्त ओव्हर्स हातात होत्या आणि त्यांना फक्त ३६ धावांची गरज होती. त्यांनी ही धावसंख्या १४ व्या ओव्हरमध्ये सहजपणे पूर्ण केली. पेनल्टीटाइम ओव्हरमध्ये बूमने एकामागून एक दोन विकेट्स घेतल्या आणि मिशेल ओवेन आणि मॅथ्यू शॉर्टला बाद केले.

सूर्या आणि कंपनी आता तिसऱ्या टी२०आयमध्ये पुनरागमन करून मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न करेल. हा सामना रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी होबर्ट येथे खेळवला जाईल.

**********

थोडक्यात धावसंख्या: भारत १२५/१० (अभिषेक शर्मा ६८, जो हेजलवूड ३/१३) चा ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सनी पराभव १२६/६ (मिशेल मार्श ४६, वरूण चक्रवर्ती २/२३).