News

ओडीआयचा राजा, मुंबईचा रोहित शर्मा

By Mumbai Indians

चॅम्पियन. लिजंड. जगज्जेता. रोहित शर्मा. 🥇

पलटन, ही बातमी ऑफिशियल आहे!! 🤩🥳 आपण या सगळ्याची किती वाट बघत होतो ना पलटन! हिटमॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची वेळ झालीय.

सर्वाधिक वैयक्तिक ओडीआय धावसंख्या: 𝟚𝟞𝟜 🤯

ओडीआय वर्ल्डकप्समध्ये सर्वाधिक शतके: 𝟟*🤯

सर्वाधिक ओडीआय द्विशतके: 𝟛* 🤯

भारताकडून सर्वाधिक ओडीआय षट्कार: 𝟛𝟜𝟡* 🤯

ओडीआय धावा: 𝟙𝟙𝟛𝟟𝟘* 🤯

ओडीआय शतके: 𝟛𝟛* 🤯

आणि आता आयसीसीचा जगातला पहिल्या क्रमांकाचा ओडीआय फलंदाज! 👏

सीबी मालिकेच्या पहिल्या अंतिम सामन्यात २००८ मध्ये ऑसीजविरूद्ध तणावपूर्ण सामन्यात अप्रतिम ६६ धावा करून ओडीआयच्या पटलावर स्वतःच्या आगमनाची घोषणा करणाऱ्या या खेळाडूच्या नावावर सिडनीच्या शेवटच्या सामन्यात ही कामगिरी आली यात काहीच नवल नाही. याच मैदानाने त्याला प्रचंड आनंद दिला आणि भारताला प्रचंड यश दिले.

मुंबईच्या अवकाशात आज हाच जल्लोष आहे … मुंबईचा राजा रोहित शर्मा! ओडीआयचा राजा, रोहित शर्मा!