AUSvIND, दुसरा ओडीआय: शेवटपर्यंत लढा परंतु पराभवाची छाया :(
दुसरा सामना आपल्याला हवा तसा संपला नाही.
एडलेड ओव्हलवर चांगल्या हवामानात झालेल्या या सामन्यात यजमान संघ दोन विकेट्सनी विजयी झाला. त्यांनी २-० ची आघाडी घेतली.
बघूया काय झाले ते:
हिटमॅनचा जलवा
आपण म्हणतो ना, फॉर्म तात्पुरता असतो, क्लास कायमस्वरूपी असतो! 🔥
रोने स्थिरावायला थोडा वेळ घेतला. त्याने संयमाने पॉवर प्लेचा टप्पा पार केला आणि योग्य वेळी हल्ला करून ७३ धावा केल्या. सात चौकार आणि दोन षट्कार फटकावले.
अशा रितीने ओडीआयमध्ये भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून सौरव गांगुलीला मागे टाकले. 👏
𝗚𝗥𝗘𝗔𝗧𝗡𝗘𝗦𝗦 ✨ pic.twitter.com/HqxLsFu19C
— Mumbai Indians (@mipaltan) October 23, 2025
श्रेयस अय्यरही सोबत आला
धावांच्या पाठलागात आणखी एक खेळाडू सहभागी होता. तो म्हणजे आपला श्रेयसभाई.
रोहितबरोबर त्यानेही ७७ चेंडूंमध्ये ६१ धावांचा विक्रम केला आणि भारतीय चाहत्यांच्या गोटात आनंदाची लहर पसरली.
याशिवाय भारतीय संघ १७/२ वर पिछाडीला असताना रोहितसोबत त्याच्या ११८ धावांच्या भागीदारीने नौका सावरली.
अक्षरची धमाकेदार कामगिरी, हर्षित-अर्शदीपचा सुंदर खेळ
बापूच्या ४१ चेंडूंमध्ये ४४ धावा, तसेच इनिंगच्या शेवटी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या चौकारांमुळे भारतीय संघाची धावसंख्या २६४/९ वर गेली.
सलामी फलंदाज लवकर बाद झाले
मिशेल मार्श (११) आणि ट्राविस हेड (२८) या सलामी जोडीला भारतीय संघाने १३ ओव्हर्समध्येच घरी पाठवले.
धावसंख्या ५४/२ वर असताना इनिंग आपल्या बाजूने वळेल असे दिसत होते. परंतु ऑसीजच्या मधल्या फळीने स्वप्नभंग केला.
शॉर्ट, कोनोली यांनी सामना ताब्यात घेतला
त्यानंतर सामन्याचा पेंडुलम पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळला. त्यांनी वेळोवेळी चौकार, षट्कार मारून आणि स्ट्राइक रेट फिरवत ठेवून स्कोअरबोर्ड हलता ठेवला.
मॅथ्यू स्टॉर्ट आणि कूपर कोनोली यांनी प्रत्येकी अर्धशतके केली तर त्यांच्या संघाने वेळोवेळी पाठबळ दिले.
अर्थात, शुभमन गिल आणि कंपनीने लढा कायम ठेवला. त्यांनी शेवटच्या टप्प्यात विकेट्स घेणे कायम ठेवले आणि प्रतिस्पर्धी संघाला कायम धाकात ठेवले.
हरकत नाही पोरांनो. एक मालिका आपल्या हातातून निसटली म्हणून काय झाले? टीमची क्षमता याने थोडीच निश्चित होते? भारतीय क्रिकेट टीम शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सिडनीवर मैदानात उतरेल आणि नक्कीच विजयी होईल.
**********
थोडक्यात धावसंख्या: भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दोन विकेट्सनी पराभव २६४/९ (रोहित शर्मा ७३; एडम झम्पा ४/६०) ऑस्ट्रेलिया २६५/८ (मॅथ्यू शॉर्ट ७४; वॉशिंग्टन सुंदर २/३७).