दिवाळीच्या शुभेच्छा, पलटन!! ब्लू अँड गोल्डसाठी आतषबाजीची आठवण
By Mumbai Indians | 20 Oct, 2025
mi
वर्षाचा तो कालावधी परत आलाय. आकाशात चकचकाट होतोय, दिवे उजळले आहेत आणि सर्वांचा मूड एक नंबर आहे! 🤗
आपली पोरं मैदानावर आपला फटाक्यांचा ब्रँड घेऊन येणार आहेत. पण आपली पलटनदेखील मागे राहणार नाहीये. या दिवाळीत २०२५ च्या मोहिमेला उजळ बनवणाऱ्या काही स्फोटक क्षणांचा आनंद घेऊया. तर निवांत बसा, मिठाई खा आणि आपल्या खेळाडूंच्या धमाक्याचा आनंद घ्या.