News

#BANvIND मालिका पूर्वावलोकनः आपल्या तोफा परतल्या

By Mumbai Indians

भारताचे मिशन २०२३ विश्वचषक आपल्याला अपेक्षेप्रमाणे सुरू झाले नाही कारण पावसामुळे न्यूझीलंडचा पांढऱ्या चेंडूचा दौरा बऱ्यापैकी धुतला गेला आणि भारताने मालिका १-० ने गमावली. परंतु आता शेजारच्या देशात तसे होणार नाही. भारतीय संघाला बांग्लादेशमध्ये होणारी तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची आशा आहे आणि त्यामुळे पुढील वर्षाच्या ओडीआय विश्वचषकाची तयारीही सुरू होईल.

मागील सात वर्षांत या दोन्ही संघांदरम्यान खेळली जाणारी ही पहिली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका असेल. हिटमॅन रोहित शर्मा कर्णधार पदावर परतणार आहे आणि तो गोलंदाजांचाही धुव्वा उडवेल अशी आशा आहे. कोहली आणि राहुल हे तडफदार खेळाडूही टी२० विश्वचषकानंतर प्रथमच संघात परतणार आहेत. उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्यानंतर आपल्यालाही थोडा वेळ लागणारच होता.

अनुभवी शिखर धवनने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय टीमचे नेतृत्व केले आणि स्कायदादावरचा भार लक्षात घेऊन त्याने आपली कामगिरी चोख बजावली.

ही तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका रविवारी (४ डिसेंबर) सुरू होत आहे. पहिले दोन सामने मिरपूरमध्ये खेळले जातील तर शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना चट्टोग्राममध्ये १० डिसेंबर रोजी खेळला जाईल.

भारताला २०१५ मध्ये बांग्लादेशविरूद्ध खेळलेल्या मालिकेत २-१ ने हार पत्करावी लागली होती. मुस्ताफिजुर रहमानने तीन सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आणि तो आता घरच्या खेळपट्टीवर पुन्हा हल्ला करायला सज्ज आहे.

काय: बांग्लादेश विरूद्ध भारत, तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका.

कधी: ४ डिसेंबर, ७ डिसेंबर आणि १० डिसेंबर

कुठे: मिरपूर (पहिली आणि दुसरी ओडीआय) आणि चट्टोग्राम (तिसरी ओडीआय)

ते काय म्हणतात

"एनसीए आणि मेडिकल टीम्स जसप्रीत बुमराची खूप चांगली काळजी घेत आहेत. तो नक्कीच टीमचा भाग असेल. आमच्या मते २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया मालिकेत तर तो नक्कीच खेळू शकेल. परंतु, बांग्लादेशबाबत आम्ही थोडे सावध आहोत – भारतीय मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा.

"टस्कीन अहमद हा पहिल्या ओडीआयमध्ये बाहेर असेल आणि आणखी एक फिटनेस चाचणी झाल्यानंतरच तो उर्वरित मालिकेत खेळणार की नाही हे आम्हाला कळू शकेल. तमीम इक्बालबाबतही जांघेतील दुखापतीमुळे शंका आहे. परंतु आम्ही पुढचे काही दिवस त्याची तपासणी करत राहू." बांग्लादेशी मुख्य सिलेक्टर मन्हाजुल अबेदिन.

काय अपेक्षा आहे: भारत आणि बांग्लादेशमधील शत्रुत्व! आणि या मालिकेबद्दलचे तूफान वेड. भारत एकास एक सामन्यांबाबत नक्कीच वर्चस्वात आहे परंतु घरच्या खेळपट्टीवर सर्वांत मोठ्या शेजाऱ्याला हरवण्याची शक्यता अस्तित्वात आणण्यासाठी टायगर्स सज्ज असतील. तर थोडा रक्तदाब सांभाळून ठेवा!

बांग्लादेशसाठी भारताचा ओडीआय संघः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, दीपक चहर, शिखर धवन, ईशान किशन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, अक्झर पटेल, रजत पटीदार, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर.

बांग्लादेशी ओडीआय संघ: लिट्टन दास (कर्णधार), अफीफ हुसेन, अनामूल हक, इबादत हुसेन, हसन महमूद, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, मुश्फिकर रहीम, मुस्ताफिजूर रहमान, नजमुल हुसेन शांतो, नसूम अहमद, नुरूल हसन, शकीब अल हसन, तस्किन अहमद, यासीर अली.

तुम्ही काय करायचे आहे: तुमची भूक वाढवा! ही मालिका प्रत्येकी ५० ओव्हर्सची असेल. त्यामुळे आपले हिटमॅन आणि कोहली आपल्याला चविष्ट ड्राइव्ह्स आणि देखण्या कट्सची मेजवानी देऊ शकतात. चहर आणि सिराज यांचे स्वादिष्ट स्विंगर्स आणि उमरानकडूनही गोड मिळू शकते. स्काय खेळत नाहीये. पण नवीन कुणीतरी खेळताना बघण्याचा आनंद वेगळाच असतो की!