News

INDvNZ: २०२६ चा पहिला सामना किवीजसोबत घरच्या खेळपट्टीवर

By Mumbai Indians

तयारी करा पलटन! #TeamIndia पुन्हा मैदानात उतरतेय! 🤩

घरच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडविरूद्ध पांढऱ्या चेंडूने सामन्यापेक्षा जास्त चांगले काय असू शकते?

वर्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ किवीजचे स्वागत करणार आहे. यात तीन ओडीआय आणि पाच टी२०आय सामने असतील. त्यामुळे आपल्याला नॉन स्टॉप एक्शन, मस्त धमाल आणि मनोरंजन अनुभवता येईल.

या वेळी आपल्या उत्साहात भर घालण्यासाठी आपली लाडकी जोडी (कोण ती माहीत असेलच 😉) मैदानात खेळायला उतरणार असून पुन्हा एकदा सामन्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आपल्या अंगावर रोमांच येणार हे नक्की.

ही वेळसुद्धा उत्तम आहे. टी२० वर्ल्ड कप मालिका लवकरच सुरू होणार असल्यामुळे सूर्यादादा आणि कंपनी आपली तयारी तपासणार आहेत, हत्यारं परजणार आहेत आणि किवीजविरूद्ध ५ सामन्यांच्या टी२०आय मालिकेचा त्यांना यात खूप फायदा होईल.

आता वेगाचेच बोलायचे झाले तर भारतीय संघ विजयाच्या लाटेवर स्वार आहे. त्यांनी एकामागून एक दिसंघीय मालिका जिंकल्या आहेत आणि ते अत्यंत उत्साहाने आघाडी घेत आहेत. या वेळचे मिशनही तसेच आहेः वर्चस्व, मनोरंजन आणि विजयाची सवय कायम ठेवणे. 👊🏆

अर्थात, किवीजना हलक्यात घेण्याचे काही कारण नाही. आपली चिकाटी, शिस्तबद्धता आणि सामना जिंकण्याची इच्छाशक्ती यांच्यासाठी हा संघ ओळखला जातो. त्यामुळे ते भारताला कडवी टक्कर देणार यात शंका नाही.

आता दोन व्हाइट बॉलचे दिग्गज संघ. आठ दणदणीत सामने. वर्षाची अप्रतिम सुरूवात. आता तारखा लक्षात ठेवा बरं का. विसरू नका. चला तर मग🔥💙

भारत विरूद्ध न्यूझीलंड- ओडीआय आकडेवारी

ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

न्यूझीलंड

62

विजय

50

50

पराभव

62

7

अनिर्णित

7

1

बरोबरीत

1

सचिन तेंडुलकर (1,750)

सर्वाधिक धावा

रॉस टेलर (1,385)

जवगल श्रीनाथ (51)

सर्वाधिक विकेट्स

टिम साऊथी (38)

*****

भारत विरूद्ध न्यूझीलंड - टी२०आय आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

न्यूझीलंड

१४

विजय

१०

१०

पराभव

१४

बरोबरीत

रोहित शर्मा (५११)

सर्वाधिक धावा

कॉलिन मन्रो (४२६)

जसप्रीत बुमराह (१२)

सर्वाधिक विकेट्स

ईश सोधी (२५)

*****

न्यूझीलंडचा भारत दौरा २०२६ वेळापत्रक

दिनांक

सामना

स्थान

वेळ (आयएसटी)

११ जानेवारी

पहिला ओडीआय

वडोदरा

दुपारी १.३०

१४ जानेवारी

दुसरा ओडीआय

राजकोट

दुपारी १.३०

१८ जानेवारी

तिसरा ओडीआय

इंदोर

दुपारी १.३०

२१ जानेवारी

पहिला टी२०आय

नागपूर

सायं ७.००

२३ जानेवारी

दुसरा टी२०आय

रायपूर

सायं ७.००

२५ जानेवारी

तिसरा टी२०आय

गुवाहाटी

सायं ७.००

२८ जानेवारी

चौथा टी२०आय

विशाखापट्टणम

सायं ७.००

३१ जानेवारी

पाचवा टी२०आय

तिरूवनंतपुरम

सायं ७.००