News

डीसीविरूद्ध गोलंदाजांच्या जादूला पूरक फलंदाजांकडून १६० धावांचा यशस्वी पाठलाग

By Mumbai Indians

जसप्रीत बुमराची तडाखेबाज तीन विकेटची ओव्हर आणि ईशान किशन, टिम डेव्हिड आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या मोठ्या इनिंग्समुळे आम्ही सीझन खूप उत्साहात संपवू शकलो.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून ट्रिस्टन स्टब्स आणि संजय यादवऐवजी हृतिक शौकीन आणि ब्रेविस यांना परत आणले.

आमच्या गोलंदाजांनी नवीन बॉलने सुरूवात केली. डॅन सॅम्स आणि हृतिक शौकीन यांनी खूप ताणून गोलंदाजी केली. सॅम्सने तिसऱ्या ओव्हरमध्ये वॉर्नरला बाद केले आणि त्यानंतर बूमने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिशेल मार्शला पॅव्हिलियन दाखवले.

बूमने त्यानंतर एका अप्रतिम बाऊन्सरने पृथ्वी शॉला बाद केले आणि मयंक मार्कंडेने सरफराज खानला एक शार्प टर्नर टाकून आऊट केले. त्यामुळे ८.४ ओव्हर्समध्ये डीसी ५०/४ पर्यंत आली.

डीसीचा कर्णधार ऋषभ पंत आणि रोवमन पॉवेल यांनी ७५ धावांची एक चांगली भागीदारी केली. पण त्यांना खूप वेळा सीमारेषेपार चेंडू टोलवता आला नाही कारण आमच्या गोलंदाजांनी स्लो पिचचा उत्तम वापर केला.

रमणदीप सिंगने आपल्याला एका वाइड बॉलने एक पंतची महत्त्वाची विकेट काढून दिली. त्यानंतर बूमने तडाखेदार यॉर्कर टाकून धोकादायक पॉवेलला बाद केलं. शेवटी डीसीचा स्कोअर १५९/७ असा झाला.

या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि ईशानने सावधगिरीने सुरूवात केली. त्यांनी अत्यंत कठीण स्विंग्सचा सामना करत पाच ओव्हरमध्ये २५ धावा काढल्या. त्यानंतर रो सहाव्या ओव्हरमध्ये मिड ऑनवर कॅच देऊन बाद झाला.

त्यानंतर ब्रेव्हिस ईशानसोबत खेळायला आला आणि या दोघांनी ५० धावांची भागीदारी केली. त्यांनी स्पिनर्स अक्सर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या बॉल्सना सीमापार पाठवले.

त्यानंतर ईशान अर्धशतकाला थोड्याच धावा कमी असताना कुलदीप यादवच्या चेंडूवर मिड विकेटवर बाद झाला आणि त्यानंतर ब्रेविस दोन ओव्हर्सनी ३७ धावांवर बाद झाला.

टिम डेव्हिड आणि तिलक वर्मा क्रीझवर आले आणि डेव्हिडच्या जोरदार फटक्यांनी सामन्याचे पारडे आपल्या बाजूला झुकवले.

त्याने खलील अहमदच्या चेंडूंवर एक सिक्स आणि चौकार मारला आणि शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकले. आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. परंतु आम्हाला तोपर्यंत शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये फक्त १४ धावांची गरज होती.

पेनल्टीटाइम ओव्हरमध्ये तिलक बाद झाल्यानंतरही रमणदीप सिंगने दोन चौकार मारल्यामुळे आम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये १६० धावा पूर्ण केल्या आणि अत्यंत उत्साहात सीझन संपवला.

कर्णधार रोने नंतर सर्वांचे खूप कौतुक केले.

“आम्ही इथे सामना जिंकायला आलो होतो आणि उत्तम कामगिरी करून सीझन संपवायचा होता. आम्ही सीझनच्या दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी केली असे मला वाटते,” असे तो सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

या आव्हानात्मक परिस्थितीत ईशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस यांची भागीदारी धावांचा पाठलाग करण्यासाठी महत्त्वाची ठरली असे त्याचे मत होते.

“ही पिच स्लो होती आणि १६० धावा काढण्यासाठी योग्य नव्हती असे मला वाटते. आमची सुरूवात फार चांगली झाली नाही. पण ईशान- ब्रेविसच्या भागीदारीमुळे आम्ही चांगल्या स्थितीत आलो. आम्ही या सीझनमधून काही सकारात्मक गोष्टी घेऊ शकतो आहोत. पात्र झालेल्या सर्व टीम्सचे अभिनंदन,” रो शेवटी म्हणाला.

गोलंदाज आणि फलंदाज या दोघांकडूनही परिपूर्ण परफॉर्मन्स झाल्यामुळे आम्ही सीझन उत्तमरित्या संपवू शकलो.

संपूर्ण सीझनमध्ये आम्हाला सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल आमच्या पलटनचे खूप आभार. आम्ही पुढच्या सीझनमध्ये नक्कीच उत्तम कामगिरी करू!