News

आशिया कपमध्ये एमआय स्टार्स – भूतकाळाची उजळणी

By Mumbai Indians

आशिया कप नेहमीच ड्रामा, तीव्र भावना आणि अविस्मरणीय आठवणींचा ठरला आहे. आणि तुम्हाला माहित्ये का? आपले काही महान मुंबई इंडियन्सचे खेळाडू <आणि भविष्यातले खेळाडूही > मोठ्या स्टेजवर इतकी दैदिप्यमान कामगिरी करून गेले आहेत की चाहत्यांनी त्यांच्या जल्लोषात काहीही कमी सोडलेली नाही.

आता आपण आशिया कप २०२५ सुरू होण्यापूर्वी आपल्या आठवणींचा जागर करूया.

हार्दिक पांड्या 🆚 पाकिस्तान (२०२२)

ऑरा फार्मिंग काय असते ते आपल्याला माहीतच आहे. २०२२ मध्ये पाकिस्तानविरूद्ध हार्दिकने केलेल्या ३/२५ आणि ३३* (१७) धावा त्याची नेहमीची कामगिरी किंवा खेळ नव्हता. तो त्याचा एटिट्यूड होता. त्यामुळे त्याला सामनापटूचा पुरस्कार मिळाला.

परिस्थिती गंभीर तेव्हा पांड्यादादा खंबीर असतो हे त्याने दाखवून दिले. त्याने तणावाचा सामना केला आणि आपल्या खास पांड्या स्टाइलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला. मोठा सामना असेल, मोठे स्टेज असेल तर पांड्या उत्तम खेळणारच.

**********

सचिन तेंडुलकर 🆚 बांग्लादेश (२०१२)

मास्टरब्लास्टरशिवाय आशिया कपचा विचारही करता येणार नाही. सचिनने २०१२ मध्ये बांग्लादेशविरूद्ध केलेल्या ११४ धावा हा फक्त एक टप्पा नव्हता तर ते त्याचे १०० वे आंतरराष्ट्रीय शतक होते. त्याच्या या कामगिरीचा गौरव संपूर्ण जगभरातील चाहत्यांनी केल्या. या इनिंगने सचिनची ओळख नव्याने करून दिली- उत्साह, वचनबद्धता आणि सातत्यपूर्णता.

**********

रोहित शर्मा🆚 पाकिस्तान (२०१८)

दुबईत पाकिस्तानविरूद्ध रोहित शर्माने तर धावांची छपाईच सुरू केली होती. त्याने 111* धावा फटाफट टोलवल्या. खरे वाटत नाही पण हे खरे आहे.

रोहित अतिशय शांत, संयमी आणि अचूकतेने खेळला. आपल्या स्टाइलमध्ये पाठलाग केला आणि त्याने काहीही हातचे न राखता चेंडू सतत सीमापार टोलवला.

**********

सूर्यकुमार यादव 🆚 हाँगकाँग (२०२२)

या सामन्यात स्कायने फक्त फलंदाजी केली नाही तर अद्वितीय स्ट्रोक्स मारून यूएईचे आकाश भारून टाकले. हाँगकाँगविरूद्ध त्याच्या ६८ (२६) धावा एका हायलाइट रीलपेक्षा कमी नव्हत्या- त्यात सुपला, नो लूक सिक्स आणि इतरही बरेच काही होते!

ही एक स्टेटमेंट इनिंग होती. त्यात भारताला त्याचा नवीन टी२० कलाकार सापडला होता. आणि खरं सांगायचं तर, आशिया कपच्या रात्रीचा ३६०°कॅनव्हास फक्त स्कायच बनवू शकतो.

**********

जसप्रीत बुमरा 🆚 श्रीलंका (२०१६)

तरूण ताज्यातवान्या बुमराहने २०१६ मध्ये अगदी स्टाइलमध्ये स्वतःच्या आगमनाची घोषणा केली. त्याने १० शून्य धावा चेंडू टाकले आणि २/२७ ची कामगिरी केली.

त्याच्या भेदक यॉर्कर्सनी फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे एमआय चाहते त्याला अभिमानाने बूम बूम बुमराह का म्हणतात हे कळले. येणाऱ्या काळात काय घडणार आहे याची झलक मिळाली!

**********

लसिथ मलिंगा 🆚 पाकिस्तान (२०१०)

स्लिंगा मलिंगा आपल्या सर्वोत्तम काळात फलंदाजांसाठी दुःस्वप्न ठरला होता. २०१० च्या आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ५/३४ ची त्याची कामगिरी विंटेज होती- त्याचे टो-क्रशर, तीक्ष्ण बाउन्सर आणि पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळणाऱ्या विकेट. फुल राडा...

**********

आपण आशिया कप २०२५ कडे जात असताना नवीन प्रकरणे, नवीन हिरोज आणि खूप मज्जा येणार आहे. कारण एमआयची पोरं मैदानात उतरतात तेव्हा जादू घडते. इतिहासाला सगळं माहीत आहे