News

बुमरा, पंड्या, तिलक, धवन टीम इंडियामध्ये प्रवेश मिळालेल्या एमआयच्या तरूण खेळाडूंची यादी

By Mumbai Indians

टॅलेंट आणि स्वप्ने या दोन्हींचा कष्टांसोबत मेळ घातला की महान गोष्टी घडून येतात. मुंबई इंडियन्समध्ये आम्ही उगवत्या टॅलेंटना प्रोत्साहन देऊन जगासमोर आणणारे एक व्यासपीठ निर्माण केले आहे. इथे यशोगाथा नुसत्या उदयाला येत नाहीत तर त्या भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्त्वाचा आदर्श निर्माण करतात.

क्रिकेट, एमआय आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यामधील सुंदर नाते आता १६ व्या वर्षात आले आहे. तिलक वर्मा हा आमच्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंची निर्मिती करणारा एक फक्त महान खेळाडूच नाही तर भारताला नवनवीन आघाडीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा एक दूरदर्शीही आहे.

तो आपल्या महान आणि ख्यातनाम भारतीय सुपरस्टार्सच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालला आहे- जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, अंबाटी रायुडू, अभिषेक नायर, मनिष पांडे, धवल कुलकर्णी आणि मयंक मार्कंडे. यांनी भारताच्या निळ्या गणवेशात आपले स्थान प्रस्थापित करण्यापूर्वी ब्लू आणि गोल्डमध्ये आपल्या खेळाची चुणूक जगाला दाखवली होती.

अक्झर पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे एमआयचाच भाग होते परंतु त्यांना मोठ्या संधी मिळाल्या नाहीत. परंतु आपल्या एकेकाळी फॅ-एमआय-लीचा भाग असल्यामुळे आपण आयसीसी सामन्यांमध्ये किंवा उभयपक्षी सामन्यांमध्ये त्यांनी विविध ठिकाणी मिळवलेल्या विजयाबाबत त्यांचे कौतुक केले आहे.

ईशान किशन आणि शिखर धवन हे सर्वाधिक कौतुकास्पद खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या आयपीएल करियरची सुरूवात एमआयसोबत केली नाही. परंतु त्यांच्या ब्लू आणि गोल्डमधील अनुभवामुळे त्यांना भारतीय टीममध्ये यशाचे दरवाजे खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला.

विविध खेळाडूंना एमआय टीममध्ये मोठी संधी मिळाली असेल किंवा मिळाली नसेल. परंतु आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो कारण त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म त्यांना दिला आहे.

खेळाडू

एमआयमधील पहिले वर्ष

एमआय सीझन्स

भारतीय संघात प्रवेश

सौरभ तिवारी

2008

2008-2010, 2017, 2018, 2020 आणि 2021.

ऑक्टोबर 20, 2010, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

अभिषेक नायर

2008

2008-2010

जुलै 03, 2009, वेस्ट इंडिजविरूद्ध

मनिष पांडे

2008

2008

जुलै 14, 2015, झिम्बाब्वेविरूद्ध

अजिंक्य रहाणे

2008

2008-2010

ऑगस्ट 31, 2011, इंग्लंडविरूद्ध

धवल कुलकर्णी

2008

2008-2013, 2020,2021

सप्टेंबर 02, 2014, इंग्लंडविरूद्ध

शिखर धवन

2009

2009-2010

ऑक्टोबर 20, 2010, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

अंबाटी रायुडू

2010

2010-2017

जुलै 24, 2013, झिम्बाब्वेविरूद्ध

युजवेंद्र चहल

2011

2011-2013

जून 11, 2016, झिम्बाब्वेविरूद्ध

सूर्यकुमार यादव

2012

2012-2013, 2018-आतापर्यंत

मार्च 14, 2021, इंग्लंडविरूद्ध

कुलदीप यादव

2012

2012

मार्च 25, 2017, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

ऋषी धवन

2013

2013

जानेवारी 17, 2016, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

अक्झर पटेल

2013

2013

जून 15, 2014, बांग्लादेशविरूद्ध

जसप्रीत बुमरा

2013

2013- आतापर्यंत

जानेवारी 23, 2016, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

हार्दिक पंड्या

2015

2015-2021

जानेवारी 26, 2016, ऑस्ट्रेलियाविरूद्ध

नितीश राणा

2015

2015-2017

जुलै 23, 2021, श्रीलंकेविरूद्ध

कृणाल पंड्या

2016

2016-2021

नोव्हेंबर 04, 2018, वेस्ट इंडिजविरूद्ध

कृष्णप्पा गौतम

2017

2017

जुलै 23, 2021, श्रीलंकेविरूद्ध

राहुल चहर

2018

2018-2021

ऑगस्ट 06, 2019, वेस्ट इंडिजविरूद्ध

ईशान किशन

2018

2018-आतापर्यंत

मार्च 14, 2021, इंग्लंडविरूद्ध

तिलक वर्मा

2022

2022- आतापर्यंत

ऑगस्ट 03, 2023, वेस्ट इंडिजविरूद्ध

काय म्हणता पलटन? भारतासाठी खेळलेला एमआयचा सर्वोत्तम खेळाडू कोण? चला चला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा बरं.