News

"दीर्घकाळ टिकून कायमस्वरूपी मूल्यवर्धन करणाऱ्या खेळाडूंच्या समावेशाच्या धोरणाशी ग्रीन सुसंगत"- आकाश अंबानी

By Mumbai Indians

टाटा आयपीएल २०२३ खेळाडूंच्या लिलावातील बहुप्रतीक्षित अष्टपैलू खेळाडूंसाठीच्या अत्यंत अटीतटीच्या बोलीयुद्धात मुंबई इंडियन्सने अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला १७.५० कोटी रूपयांत साइन केले आहे. हा २३ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या सातत्यपूर्ण आणि खेळाडे पारडे पलटवणाऱ्या कामगिरीद्वारे क्रिकेट वर्तुळात तरूणांमध्ये प्रिय आहे.

या खरेदीबाबत बोलताना, मुंबई इंडियन्सचे मालक श्री. आकाश अंबानी म्हणाले की, “आम्ही मागील तीन वर्षांपासून कॅमेरॉन ग्रीनच्या खेळावर लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्या अलीकडच्या कामगिरीमुळे आपल्याला हेच हवे होते असे आमचे मत झाले. आम्ही तरूण खेळाडूच्या शोधात होतो आणि तो आमच्यासाठी अत्यंत योग्य वयातला खेळाडू आहे. तुम्ही पाहिले तर मागच्या दोन लिलावांमध्ये आम्ही तरूण आणि आमच्यासाठी कायमस्वरूपी मूल्यवर्धन करू शकणाऱ्या खेळाडूंची जाणीवपूर्वक निवड केली आहे. त्यामुळेच आमच्या मते कॅमेरॉन ही अत्यंत सुयोग्य निवड ठरली. कॅमेरॉन ग्रीनला आमच्याकडे आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

तरूण खेळाडूंसाठी बोली लावण्याच्या दृष्टीकोनाबाबत बोलताना श्री. अंबानी म्हणाले की, “आम्ही कायम संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अर्थातच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा अशा अनुभवी खेळाडूंना राखले आहे. परंतु आम्ही दीर्घकालीन कामगिरीसाठी तरूण खेळाडूंची निवड करण्याचा विचार केला.”

कॅमेरन ग्रीनला मिळवण्यासाठी आतापर्यंतच्या बोलीबद्दल विचारल्यावर श्री. अंबानी म्हणाले की, “ही १० टीम्ससाठीची लिलाव प्रक्रिया आहे. मागच्या तीन वर्षांत सर्वोच्च लिलाव किमतीवर मर्यादा राहिलेली नाही. याचाच अर्थ असा की सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सर्वाधिक मागणी आहे आणि अशी कौशल्ये असलेले खेळाडू मग तो बेन स्टोक्स असो किंवा सॅम कुरान किंवा कॅमेरॉन ग्रीन, यांच्यासाठी सर्व फ्रँचायझी पैसे खर्च करायला तयार आहेत. कारण सर्वोत्तमाला पर्याय नसतो.”