News

१६ डिसेंबर २०२५: आयपीएल सीझन १९ साठी मिनी लिलावाच्या तारखा जाहीर

By Mumbai Indians

🥁 पलटन, एक नंबर बातमी येतेय बरं का 3… 2… 1… 🥁

प्रतीक्षा आता संपली आहे. तुमचे कॅलेंडर्स काढा आणि १६ डिसेंबर २०२५ ही तारीख नोंदवून ठेवा कारण एतिहाद एरेना, अबुधाबीमध्ये आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव येणार आहे.

भारताचा हा सण अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. येत्या २०२६ च्या मोहिमेतील संघातली आपली ब्लू अँड गोल्डमधली पोरं, क्लच गॉड हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तयार आहेत आणि उरलेल्या पाच जागांवर (चार भारतीय, एक परदेशी) २.७ कोटी रूपयांची पर्स आहे.

तारखा ठरल्यात

जागा ठरलीय

उत्साह? छप्पर फाड के 🔥 

पुन्हा एकदा सज्ज होण्याची, तयार होण्याची आणि २०२५ च्या सीझनच्या दोन पावलं पुढे जाऊन सहावा चषक उचलण्याची वेळ आलीय. आयपीएल २०२६ मिनी लिलावाचं काऊंटडा सुरू होतंय.