News

पलटनकडून खूप प्रेम - धन्यवाद, #BatchOf2025

By Mumbai Indians

गुडबाय... कोणताही असो, कधीच सोपा नव्हता, हो ना? 🥺 

आपण आयपीएल २०२६ च्या दिशेने जात असताना आपले काही खेळाडू बाहेर पडणार आहेत. आपल्याला ते ब्लू अँड गोल्डमध्ये दिसणार नसले तरी आपल्या मनात त्यांच्याबाबत कृतज्ञता आहे. अमर्याद, मनापासून कृतज्ञता.

ही बॅच ऑफ २०२५ खऱ्या अर्थाने खास होती. तुम्ही प्रत्येकाने आपापली कामगिरी उत्तमरित्या बजावली. तुमचा घाम, तुमचा उत्साह आणि खेळ यांनी हा सीझन सजला. तुम्ही सगळे फक्त खेळाडू नाहीत तर तुम्ही कुटुंब आहात. कठीण परिस्थितीत टीमला बाहेर काढणे असो, चांगल्या कामगिरीच्या वेळी कोणासाठीही चिअर करणे असो किंवा ड्रेसिंग रूममध्ये धमाल मस्ती असो. तुम्ही #OneFamily आज जी आहे त्याचे मूळ कारण आहात.

तुम्ही हा बॅच अभिमानाने परिधान केलात. प्रत्येक धाव काढण्यासाठी लढलात, प्रत्येक विकेट, प्रत्येक परिस्थितीत लढा दिलात. आता आपण नवीन सीझनकडे जात असताना आपण मागील अनेक वर्षांत निर्माण केलेले नाते कायम राहते आहे. कारण एकदा तुम्ही ब्लू अँड गोल्ड परिधान केला की तुम्ही कायम आमचेच आहात! 💙

तर आपल्या आठवणी, आपले यश, आपला उत्साह आणि जादू यांच्यासाठी तुम्हाला एक चिअर्स. आमच्या कथेचा भाग झाल्याबद्दल तुमचे आभार. आपल्या #OneFamily चा भाग झाल्याबद्दल आभार. 

आयपीएल २०२६ साठी मुक्त केलेले खेळाडू

बेवॉन जेकब्स

लिझाद विल्यम्स

रीस टोपली

*रिचर्ड ग्लीसन

*जॉनी बेअरस्टो

मुजीब उर रेहमान

कर्ण शर्मा

*चरिथ असालांका

विघ्नेश पुथूर

केएल श्रीजीत

अर्जुन तेंडुलकर

व्हीएस राजू

*आयपीएल २०२५ दरम्यान साइन केलेले तात्पुरते बदली खेळाडू.