News

दिवाळी x किल्ला - एमआयचा बालेकिल्ला वानखेडे

By Mumbai Indians

क्रिकेट खेळण्यासाठी विविध स्टेडियम्स आहेत आणि मग येते वानखेडे स्टेडियम. हे आहे मुंबई इंडियन्सचे काळीज, याच बालेकिल्ल्यात महान कथा रचल्या जातात आणि ब्लू अँड गोल्डमध्ये आठवणी कोरल्या जातात. 💙

मागील काही वर्षांत हे ख्यातनाम मैदान फक्त घरची खेळपट्टी ठरलेले नाही तर तो आपला अभेद्य बालेकिक्ला ठरला आहे. महाराष्ट्राच्या किल्ल्यांसारखाच तो अभिमानाने उभा आहे. तो भक्कम आहे आणि उत्साहाने सळसळता आहे. स्टँड्समध्ये चाललेला प्रत्येक जल्लोष, मुंबई... मुंबईईईईचा जयघोष आपल्या खेळाडूंना आणखी जोमाने खेळायला प्रेरणा देतो.

या सर्वाची सुरूवात झाली २००८ मध्ये. आपण या वर्षी घरच्या खेळपट्टीवर आयपीएलमधला पहिला विजय नोंदवला आणि चेन्नई सुपर किंग्सला नऊ विकेट्सने पराभूत केले. या हल्ल्याचे नेतृत्व कोणी केले? आपल्या लाडक्या सनथ जयसूर्याने. त्याने एक अप्रतिम शतक झळकवले जे या टीमचे पहिलेच शतक होते. त्याच संध्याकाळी आपला किल्ला जन्माला आला. 🏟️

तेव्हापासून वानखेडेने अगणित मास्टरक्लासेस पाहिलेले आहेत. हिटमॅनचा अप्रतिम स्ट्रोक ज्याने प्रत्येक मुंबईकराच्या चेहऱ्यावर आनंद आणला, स्लिंगाचे टो क्रशर्स, लॉर्डची गोट कामगिरी, सूर्यकुमार यादवची ३६० अंशांतली आतषबाजी, हार्दिक पांड्याचे ऑरा फार्मिंग आणि आपल्या पलटनने केलेला जल्लोष, बूमच्या गोलंदाजीच्या गोष्टी ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत वाट काढली अशा अनेक गोष्टी इथे घडल्या. वानखेडेवर प्रत्येक स्पर्धा ही फक्त सामन्यापुरती मर्यादित नसते तर इथे प्रत्येक चेंडूवर इतिहास रचला जातो. 

अर्थात आकडेवारी खोटं बोलत नसतेच. या ठिकाणी आपला विजयी रेकॉर्ड आयपीएलमधल्या सर्वोत्तमपैकी एक आहे. २०१३ मध्ये आपण याच ठिकाणी ८/८ सामने जिंकून ऐतिहासिक चषक जिंकला. वर्चस्व आणि तेही एमआयच्या स्टाइलमध्ये...

अगदी कायमस्वरूपी वानखेडे कधीच फक्त एक स्टेडियम नसेल. ती आपली ओळख, आपला अभिमान, आपला अड्डा असेल. कोणताही प्रतिस्पर्धी इथे येतो तेव्हा ही फक्त स्पर्धा ठरत नाही तर ती एक घोषणा असते की हा आपला किल्ला आहे. 😎