News

निळं वादळ येतंयः ऑसीजविरूद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज

By Mumbai Indians

तयार आहात ना, पलटन!

येत्या रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही तुल्यबळ संघ रोमांच, धमाल आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी२०आय खेळण्यासाठी तयार आहेत. 🔥

आपले मेन इन ब्लू चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मिळवल्यानंतर प्रथमच ओडीआय खेळणार आहेत. आपल्या भावना त्याच आहेत. पिच पुन्हा एकदा उजळवण्यासाठी रो- को जोडी परतलीय. इथे वाचा - RO-KO jodi is back

पलटनला आधीच त्या आठवणी येत आहेत आणि ते मैदानावर प्रचंड उत्साहात असतील... त्यामुळे रोमांचक सामने होणार हे नक्की. 🫶

मागील द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर सप्टेंबर २०२३ मध्ये भारताने २-१ असा विजय मिळवला होता आणि यावेळीही पुन्हा तेच होईल असे वाटते.

पण, थांबा. एवढेच नाहीये...

अगदी अचूकपणे सांगायचे तर त्यानंतरचे पाच टी-२० सामने पाहताना दिवाळीचे फटाके जपून ठेवावे लागतील! भारताला आशिया कपमध्ये विजय मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार दादा पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषकावर लक्ष ठेवून आणखी एक मालिका यशस्वी करण्यावर भर देईल. 🎯

थोडे मागे वळून पाहिल्यास भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील तीन टी-२० मालिका जिंकल्या आहेत आणि आपण आता आणखी एका विजयासाठी आणि ट्रॉफीसाठी उत्सुक आहोत. चला...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत - ओडीआय आकडेवारी

ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी

ऑस्ट्रेलिया

संघ

भारत

८४

विजयी

५८

५८

पराभव

८४

१०

अनिर्णित

१०

रिकी पॉन्टिंग (२१६४)

सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर (३०७७)

ब्रेट ली (५५)

सर्वाधिक विकेट्स

कपिल देव (४५)

**********

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत - टी२०आय आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

ऑस्ट्रेलिया

संघ

भारत

११

विजयी

२०

२०

पराभव

११

अनिर्णित

ग्लेन मॅक्सवेल (५७४)

सर्वाधिक धावा

विराट कोहली (७९४)

जेसन बेहरेनडॉर्फ (१३)

सर्वाधिक विकेट्स

जसप्रीत बुमराह (१७)