
#HappyBirthdayHP!! आपल्या लाडक्या कर्णधाराचा खास दिवस
काही खेळाडू असतात जे सामने खेळतात आणि काही खेळाडू मोठे क्षण जगतात. अर्थात, मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पांड्या नेहमीच असा खेळाडू ठरला आहे.
एचपी ब्लू अँड गोल्डमध्ये रंगलेला एखादा खेळाडू नाहीये. तर तो उत्साह, ऊर्जा आणि हार न मानण्याच्या वृत्तीचा प्रतीक आहे. 🤙
चला थोडं मागे वळून पाहूया?
२०१५ मध्ये बडोद्यातला हा तरूण खेळाडू आपल्याकडे टॅलेंट आणि मोठी स्वप्नं घेऊन एमआयच्या संघात खेळायला आला. आमची मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे असं उगाच म्हणत नाहीत.
टीमसाठी पहिल्याच साममन्यात त्याने दाखवलेला हेतू आणि आत्मविश्वास आणि पहिल्याच सामन्यात सलग चार वेळा पराभव झाल्यानंतर २०१५ मधला पहिलाच विजय यांच्यमुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आपला लकी चार्म ठरला तो.
त्यानंतर नऊ सीझन्स झाले. त्याच खेळाडूने सर्वाधिक यशस्वी आयपीएल फ्रँचायझीचा कर्णधार आणि या खेळातल्या सर्वांत तगड्या फिनिशर म्हणून नाव कमावले आहे. यालाच नशीब म्हणतात.
या सुंदर गणवेशात चार आयपीएल ट्रॉफीज. अप्रतिम क्लच नॉक्स. अगणित आठवणी. हा प्रवास प्रचंड मेहनत, जिगर आणि प्रेमाचे प्रतीक आहे. 💪
डेथ ओव्हर्समध्ये षट्कार ठोकणं असो, फील्डमध्ये डोळे बंद करून फटके मारणं असो किंवा टीमला सर्वाधिक गरज असेल तेव्हा उत्तम कामगिरी करणं असो. हार्दिकने वेळोवेळी आपण क्लच गॉड का आहोत हे सिद्ध केले आहे.
तणाव असतो तेव्हा त्याचा खेळ आणखी बहरतो. त्याचा शांत लुक, त्याचा आत्मविश्वास आणि मी आहे, काळजी करू नका असा दिलासा असो. तो खूप खास आहे. आणि तुम्हाला माहित्ये का? तो उत्तम कामगिरी करतोच. 🔥
तर क्लचची नव्याने व्याख्या आणि आपला करिश्मा दाखवणाऱ्या या खेळाडूला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. कारण तो आपला लाडका हार्दिक हिमांशु पांड्या आहे!
हॅप्पी बर्थ डे स्किपर! तोडफोडीची ऊर्जा कायम ठेव आणि तुझे षट्कार मैदानातून बाहेर उडत जाऊदेत! 💥