News

हॅप्पी बर्थ डे, नमन धीर ऊर्फ फिनिशर धीर

By Mumbai Indians

३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे आहेत.

वर्ष संपण्यापूर्वी हा दिवस लक्षात ठेवण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.

आपला फिनिशर नमन धीरचा बर्थ डे आहे, पलटन. 💙

मागच्या दोन सीझन्समध्ये नमन धीरने मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि प्रत्येक इनिंगमध्ये आपला प्रभाव टाकला आहे.

त्याचा फॉर्म तिथेच थांबला नाही. नमनने हीच कामगिरी स्मॅट २०२५ मध्ये कायम ठेवून १५२.५९ च्या स्ट्राइक रेटने आठ सामन्यांत तब्बल २३५ धावा फटकावल्या आणि सातत्यपूर्णता व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र काम करतात हे सिद्ध केले.

आता कॅलेंडर पुढे जात असताना एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. आपला फिनिशर सध्या तयारी करतोय. त्याचा जबरदस्त फॉर्म, वाढता आत्मविश्वास आणि मोठी आव्हाने समोर आहेत.

२०२६! तयार राहा. फिनिशर धीर येतोय. तो आणखी कौशल्यपूर्ण होऊन सज्ज होतोय. 💥

तर आपल्या लाडक्या नमन धीरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचे वर्ष धावा, चौकार षट्कारांनी आणि पलटनला अभिमान वाटेल अशा अनेक क्षणांनी भरगच्च जावो. 🥳💙