News

हॅप्पी बर्थडे, बोल्टी!

By Mumbai Indians

वीज कडाडते तेव्हा आकाश चमकतं आणि मग वादळ येतं! 🎶⚡

आणि ट्रेंट बोल्टचा बर्थडे असतो तेव्हा खूप मज्जा येते! 🕺

पिचवर वादळी वारे आणणारा आणि फलंदाजांना गोंधळून टाकणारा आपला हा लाडका बोल्टी #OneFamily च्या काळजाचा तुकडा आहे. पॉवर प्ले असो किंवा डेथ ओव्हर्स, आपला हा लाडका डावखुरा जलदगती गोलंदाज हीट, स्विंग आणि विकेट्स अक्षरशः विजेच्या वेगाने आणतो. 😎

चला आपल्या त्या आयपीएल २०२० सीझनच्या आठवणी जागवूया. बोल्टने बूमसोबत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या आपल्या दोन लाडक्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला आपल्या घातक गोलंदाजीने शब्दशः धूळ चारली. त्यांनी १५ सामन्यांमध्ये ५२ विकेट्स पटकावल्या.

पलटनसाठी हा स्वप्नातला सीझन होता. ट्रेंटच्या तूफान गोलंदाजीने पाया रचला आणि आपण एमआयचा पाचवा आयपीएल चषक जिंकला. डीसीविरूद्ध अंतिम सामन्यात त्याला सामनापटूचा पुरस्कार मिळाला. त्याला तो मिळणारच होता.

पण तो बोल्ट आहे. ट्रेंट बोल्ट. हा आपला लाडका किवी खेळाडू इथेच थांबला नाही. तो एमआयच्या इतर फ्रँचायझींमध्येही धमाल करतोय. एमआय एमिरेट्स, एमआय केपटाऊन आणि एमआय न्यूयॉर्कवरही त्याने आपली छाप सोडलीय. तो जिथे जातो तिथे ट्रॉफीजचा वर्षाव होतो. त्याची सातत्यपूर्णता, जुळवून घेण्याची क्षमता आणि चॅम्पियनसारखे वर्तन त्याला एक सामना विजेता ठरवते.

मैदानाबाहेरही तो खूप धमाल करतो. मस्ती करतो, चेष्टा करतो आणि वारंवार हॅप्पी होली आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो. 😬 त्याची ती स्माइल, चेहऱ्यावरचे हसू आणि ऊर्जा- एमआयला शोभेशीच आहे. 💙

तर मग आपल्या या एकमेवाद्वितीय ट्रेंट बोल्टला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे थंडरबोल्ट्स कायम धडाडत राहूदेत! 🥳