News

मी शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित केलः डॅनियल सॅम्स

By Mumbai Indians

डॅनियल सॅम्सने शेवटच्या ओव्हरमध्ये टाकलेल्या सुंदर गोलंदाजीमुळे नऊ धावा रोखण्यात आणि गुजरात टायटन्सविरूद्ध विजय मिळवणे शक्य झालं. या अत्यंत उत्साही ऑस्ट्रेलियन खेळाडूने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली.

या डावखुऱ्या गोलंदाजाने संपूर्ण ओव्हरमध्ये स्लो बॉल टाकले आणि फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. हे आम्ही आधीपासून ठरवलं होतं, असं त्याने सांगितलं.

“मी माझ्यातल्या कौशल्यावर भर दिला- स्लो चेंडू टाकणे. मी थोडीफार लांबी वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचा प्रयत्न केला आणि योग्य आणि स्लो बॉलिंग करत त्याच्यापासून (डेव्हिड मिलर) चेंडू दूर ठेवला,” डॅन म्हणाला.

“वाइड बॉलिंगबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो. चुकीचा चेंडू टाकून षटकार देण्यापेक्षा वाइड बॉल टाकणे कधीही चांगले. कधीकधी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. परंतु मी आज गोलंदाजीवर एकाग्रता साधली होती.”

सीझनच्या सुरूवातीच्या टप्प्यात काही सामने कठीण गेल्यानंतर सॅम्स हा अलीकडच्या सामन्यांमध्ये एक उत्तम खेळाडू ठरला आहे. त्याच्या मते कठीण सामन्यांमुळे त्याला उत्तम कामगिरी करण्यासाठी मदत मिळाली.

“मला या कालावधीत त्या सामन्यांवर आणि मी ज्या गोष्टी चांगल्याप्रकारे करू शकतो त्यावर विचार करण्याची संधी मिळाली. मी काही सामन्यांमध्ये सुरूवात केली परंतु मी ज्या गोष्टी उत्तमरित्या जमतात त्या करण्यावर भर दिला. त्यामुळे मला काम करायला आणि टीममध्ये परत आल्यावर त्या गोष्टी अंमलात आणायला वेळ मिळाला. मी मागच्या काही सामन्यांत खूप शांत होतो,” तो म्हणाला.

एक रोमांचक सामना आणि डॅनकडून श्वास रोखून धरायला लावणारी शेवटची ओव्हर यांच्यामुळे आज आम्ही खूप आनंदाने झोपायला जातोय. गुडनाइट, पलटन!