
२०२५ मध्ये एमआय #OneFamily: तीन खंडांमध्ये पाच प्लेऑफ्स, तीन चॅम्पियनशिप ट्रॉफीज
२०२५ हे वर्ष आपल्यासाठी खास आहे. पाच टीम्स. पाच प्लेऑफ्स. आशिया, आफ्रिका, अमेरिका या तिन्ही खंडांमध्ये चॅम्पियन्स. मुंबई इंडियन्स #OneFamily मध्ये विजयी. आपल्या नावावर आणखी एक स्टार लावला आहे. आपल्या ब्लूमध्ये आणखी थोडे गोल्ड आले आहे. एमआय न्यूयॉर्कने यूएसएमध्ये दुसरा एमएलसी चषक जिंकून इतिहास रचलाय आणि आपल्या इतिहासाचे एक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे.
आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा. खरेतर आनंद साजरा करण्यासाठीच हे संपूर्ण वर्ष आहे. एमआय एमिरेट्सनी प्लेऑफ्समध्ये सर्वप्रथम प्रवेश केला. एमआय केपटाऊन एसए२० मोहिमेत वर्चस्व गाजवून आपला पहिला चषक नावावर नोंदवला.
त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या महिला टीमने गोष्टी आपल्या हातात घेतल्या आणि डब्ल्यूपीएलमध्ये दुसऱ्या चॅम्पियनशिपच्या दिशेने पाऊल टाकले. मग पुरूषांच्या संघाने उत्तम कामगिरी करत पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामने हरलेले असताना पुढचे सलग सात सामने जिंकले. त्यांनी प्लेऑफ्समध्ये थेट धडक मारली. आपण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बाहेर पडलो परंतु ही मोहीम आपल्यासाठी अभिमानास्पद ठरली.
… आणि आता अमेरिकेतल्या आपल्या टीमने या वर्षातली सर्वोच्च कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले, योग्य वेळी योग्य कामगिरी केली. ते पहिल्या सात लीग सामन्यांमधला फक्त एकच सामना जिंकले होते. परंतु मग त्यांना कोणीही रोखू शकले नाही. त्यांनी आपल्या समृद्ध इतिहासातला १३ वा चषक आपल्या नावावर केला आहे.
५ – आयपीएल (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) | मुंबई इंडियन्स
२ – सीएलटी२० (२०११, २०१३) | मुंबई इंडियन्स
२ – डब्ल्यूपीएल (२०२३, २०२५) | मुंबई इंडियन्स
२ – एमएलसी (२०२३, २०२५) | एमआय न्यूयॉर्क
१ – आयएलटी२० (२०२४) | एमआय एमिरेट्स
१ – SA20 (2025) | MI Cape Town
चला पार्टी करूया!