News

INDvAUS: वानखेडेवरच्या रोमांचक सामन्यात राहुलचा दणका. भारताची आघाडी

By Mumbai Indians

खूप नाट्यमय सुरू होतं सगळं. दोन्ही हातांची नखं खाऊन झाली होती. पायाची नखं कुरतडून झाली होती आणि शेजारी बसलेल्यांची नखं खायला सुरूवात करणारच होते प्रेक्षक. पण तोपर्यंत भारताने सामना जिंकला. विशेषतः वानखेडे स्टेडियमवर पुनरामगन आपल्या रक्तातच आहे. या दोन्ही टीम्समधला २००७ चा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आठवतो ना तुम्हाला?

मोहम्मद शामीची अप्रतिम गोलंदाजी (३/१७), रवी जाडेजाचा अष्टपैलू खेळ (२/४६, एक कॅच, ४५*) आणि केएल राहुलच्या बॅटमधून निघालेल्या धमाकेदार नाबाद ७५ धावा यांमुळे यजमान संघाला पाच विकेट्सनी विजय आणि मालिकेत १-० ची आघाडी घेणे शक्य झाले.

सिराज, ओडीआयचा बादशहा

वानखेडे स्टेडियमवर सध्याचा पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय गोलंदाज मोहम्मद सिराज चक्रीवादळ आणेल असे ऑसीजना अजिबात वाटले नव्हते. या जलदगती गोलंदाजाने ताशी १४० किमी च्या वेगाने गोलंदाजी केली आणि चेंडू बॅटच्या आतील कडेला लागून ट्राव्हिस हेडच्या लेग स्टंपवर जाऊन आदळला.

त्याने आपल्या पोतडीत सीन एबॉट आणि एडम झम्पा यांच्या आणखी दोन विकेट्स घेतल्या. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने मिशेल मार्श या अत्यंत धोकादायक ठरू शकणाऱ्या फलंदाजाचीही सुंदर कॅच घेऊन त्याला बाद केले.

वानखेडेवर जाड्डूची जादू

सर जडेजा यांच्या भात्यात मनोरंजनाची कमतरता नसते. त्यांनी आमच्या मुंबईला त्याची एक झलकही दाखवली.

त्याने सर्वप्रथम उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या मिशेल मार्शला खोटा शॉट खेळायला भाग पाडले. त्याचा दुसरा बळी होता ग्लेन मॅक्सवेल. त्याने त्याचा शॉट लेग साइडला खेळायचा प्रयत्न केला परंतु तिथे हार्दिक पंड्या वाटच पाहत थांबला होता.

शामी आहे ना, मग घाबरायचं कशाला

मोहम्मद शामीला मोठ्या संघांविरूद्ध गोलंदाजी करायला आवडते. ऑस्ट्रेलियन संघ त्याचा अत्यंत आवडता आहे. या ३२ वर्षीय खेळाडूने ऑसीजसोबतच्या २० सामन्यांमध्ये आपल्या विकेट्स ३२ वर नेल्या आणि या वेळी ३/१७ असा खेळ केला.

केएल राहुल परत आला!

मार्कस स्टोइनिस आणि मिशेल स्टार्क यांनी भारताच्या सलामीच्या फळीला धूळ चारल्यानंतर केएल राहुल मैदानात उतरला तो वचपा काढायच्या तयारीनेच. त्याच्यासाठी कसोटी मालिका खूप कठीण गेली. परंतु त्याने ९१ चेंडूंमध्ये ७५ दिमाखदार धावा करून सर्वांची तोंडे बंद केली. त्यात सात चौकार, एक षटकार आणि प्रचंड संयम हे सर्वच होते.

जडेजाने आपल्या ३०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राहुलला चांगलीच साथ दिली. त्याने नाबाद ४५ धावा करून भारतीय संघावरचा सुरूवातीचा ताण कमी करायला मदत केली. त्यामुळे या कमी धावसंख्येच्या रोमांचक सामन्यात भारताला पाच विकेट्सनी विजय मिळवता आला.

भारताचा उत्साह वाढवणाऱ्या या विजयानंतर आपण रविवारी म्हणजे १९ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहोत. आपला संघ मिशन २०२३ वर्ल्ड कपची तयारी जोरात करतोय. पण तुम्हाला या सामन्यातले कोणते क्षण आवडले, ते नक्की सांगा बरं का.

थोडक्यात धावसंख्या:

भारत ३९.५ ओव्हर्समध्ये १९१/५ (केएल राहुल ७५*, रवींद्र जडेजा ४५*, मिशेल स्टार्क ३/४९) कडून ऑस्ट्रेलियाचा ३५.४ ओव्हर्समध्ये १८८ धावांवर सर्वबाद करून पराभव (मिशेल मार्श ८१, मोहम्मद शामी ३/१७)