News

दोन्ही मिचेसमुळे ऑसीजचा दणदणीत विजय, ओडीआय मालिकेत १-१ ची बरोबरी

By Mumbai Indians

झाले गेले गंगेला मिळाले. पण भारतीय ड्रेसिंग रूममध्ये हा एक मोठा धक्का बसलाय कारण आता २२ मार्च रोजी चेन्नईमधल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एक रोमांचक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या छोट्या परंतु घाम काढणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत १० विकेट्सनी विजय नोंदवला. मिशेल स्टार्कच्या जबरदस्त ५ विकेट्सच्या खेळीमुळे (५/५३) आणि मिशेल मार्शने फक्त ३६ चेंडूंमध्ये फटकावलेल्या ६६ धावांमुळे त्यांना हे शक्य झाले.

स्टार्कची अचूक गोलंदाजी

पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात मिशेल स्टार्कचा धोका जाणवला होताच आणि आजच्या सामन्यात त्याने आपल्या करियरमधल्या नवव्या वेळा पाच विकेट्स घेतल्या. भारतीय संघाविरूद्ध त्याने ही कामगिरी दुसऱ्यांदा केली.

ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजाने डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए स्टेडियमवरील सुरूवातीच्या टप्प्यातल्या स्विंगचा चांगलाच वापर केला. त्याने पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स घेतल्या. आपल्या मागच्या सामन्यातला हिरो केएल राहुळ फक्त नऊ धावांवर बाद झाला.

स्टीव्ह स्मिथ मैदानातला जादूगार

प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आज तयारीतच उतरायचे ठरवले होते. एक क्षेत्रपक्षक म्हणून त्याने रोहित शर्मा (१३) आणि हार्दिक पंड्या (१) यांना बाद करून भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. हार्दिकला ज्या पद्धतीने त्याने कॅच करून बाद केले तो एक नितांतसुंदर कॅच होता असे म्हणता येईल.

त्याने कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षकांना ज्या ठिकाणी नेमले होते त्यामुळे भारतीय संघाला भरपूर धावा करता आल्या नाहीत. त्याला उगाच मुत्सद्दी म्हणत नाहीत.

एकांडा शिलेदार- कोहली

स्टार्क, सीन एबॉट (३/ २३) आणि नॅथन एलिस (२/१३) यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागत नव्हता. चारच खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली आणि त्यातल्या त्यात कोहलीने सर्वाधिक म्हणजे ३१ धावा केल्या.

या मैदानात त्याने सर्वाधिक म्हणजे ५५६ धावा केल्या आहेत (या सामन्यापर्यंत) आणि त्याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शनही घडवले आहे (ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०१० मध्ये ११८ धावा नाबाद). परंतु एलिसच्या चेंडूची लांबी त्याच्या लक्षात आली नाही आणि तो लवकरच बाद झाला.

मिच मार्शलकडून भारतीय गोलंदाजीचा फडशा

सलग तिसऱ्या वेळी आणि या मालिकेत दुसऱ्या वेळी मिशेल मार्शने भारतीय गोलंदाजांना चांगलाच धडा शिकवला. सामन्यानंतरच्या मुलाखतीत त्याने आपल्या ३६ चेंडूंमध्ये ६६ धावा मजेमजेत केल्याचे म्हटले.

ट्राव्हिस हेडने ३० चेंडूंमध्ये ५१ धावा करून त्याला चांगलीच मदत केली. त्याने तब्बल १० चौकार फटकावले. पलटन, आपण यापूर्वीही अशा परिस्थितीत अडकलो होतो आणि शेवटपर्यंत आपण हार मानलेली नाही. आता आपल्या समूहाला २-१ च्या आघाडीसाठी आपल्या पाठिंब्याची गरज आहे. तर जोरदार पाठिंबा असू द्या.

थोडक्यात सामना:

ऑस्ट्रेलिया १२१ धावा ० चेंडू (मिशेल मार्श ६६*, ट्राव्हिस हेड ५१*) कडून भारताचा ११७ धावांवर १० विकेट्सनी पराभव (विराट कोहली ३१, मिशेल स्टार्क ५/५३, सीन एबॉट ३/२३)